Advertisement

नवी मुंबईत बुधवारी कोरोनाचे नवीन ३४६ रुग्ण

नवी मुंबईत बुधवारी (२ सप्टेंबर) कोरोनाचे नवीन ३४६ रुग्ण सापडले आहेत. तर ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत बुधवारी कोरोनाचे नवीन ३४६ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत बुधवारी (२ सप्टेंबर) कोरोनाचे नवीन ३४६ रुग्ण सापडले आहेत. तर ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता २६,७७७ झाली आहे.

बुधवारी  बेलापूर ३५, नेरुळ ४९, वाशी ४६, तुर्भे ५६, कोपरखैरणे ५१, घणसोली ७५, ऐरोली २७, दिघामध्ये ७ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ३४० जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ४९, नेरुळ ८७, वाशी २९, तुर्भे ४२, कोपरखैरणे ५०,  घणसोली २,३ ऐरोली ५७ आणि दिघामधील ३ रुग्ण बरे झाले आहेत.  बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२६९० पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा ६०४ झाला आहे.

नवी मुंबईत सध्या ३४८३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ८५ टक्के झाला आहे. नवी मुंबईत ४ हजार ३५८ खाटांची संख्या आता ५ हजार ३५८ वर पोहोचली आहे. वाशी येथील निर्यात भवन महिला रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तुर्भे येथील राधास्वामी सत्संग भवन येथेही १ हजार प्राणवायूयुक्त खाटांची निर्मिती करण्यात आली आहे. तर आणखी तेराशे खाटांचे नियोजन करण्यात आले आहे.

वाशी येथील फोर्टिज हिरानंदानी या रुग्णालयाने चाळीस खाटांचे केंद्र उभे केले आहे. फोर्टिज रुग्णालयाबरोबर पालिकेने एमजीएमचे सानपाडा येथील नियोजित रुग्णालय ताब्यात घेतले असून त्या ठिकाणी प्राणवायू पुरवठा होईल अशा यंत्रणा उभी केली आहे.


हेही वाचा -

सर्वाधिक कोरोनाच्या चाचण्या करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश

खासगी रुग्णालयात राखीव खाटा ठेवण्यास ३ महिन्यांची मुदतवाढ



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा