Advertisement

नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ३६० रुग्ण

नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ३६० रुग्ण सापडले आहेत. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ३६० रुग्ण
SHARES

नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ३६० रुग्ण सापडले आहेत. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता १४ हजार ९८७ झाली आहे.  

गुरूवारी बेलापूर ४५, नेरुळ ७७, वाशी ३२, तुर्भे ३०, कोपरखैरणे ६४, घणसोली ५२, ऐरोली ५०, दिघामध्ये १० नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ३६२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर १२, नेरुळ ६९, वाशी १७, तुर्भे २६, कोपरखैरणे १२६, घणसोली ६२, ऐरोलीतील ५० रुग्ण बरे झाले आहेत.  बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १०११६ वर पोहोचली आहे.  तर मृतांचा आकडा ४११ झाला आहे.

नवी मुंबईत सध्या ४४६० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर असून पालिकेने मिशन ‘ब्रेक द चेन’ ची मोहिम सुरू केली आहे.



हेही वाचा - 

Ram Mandir: बोलवलं तरी अयोध्येत भूमिपूजनाला जाणार नाही- शरद पवार




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा