Advertisement

कल्याण डोंबिवलीत ३९६ नवीन रुग्ण, ५ जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या ३६ हजारांच्या वर गेली आहे.

कल्याण डोंबिवलीत ३९६ नवीन रुग्ण, ५ जणांचा मृत्यू
SHARES

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या ३६ हजारांच्या वर गेली आहे. मंगळवारी पालिका क्षेत्रात ३९६ नवीन रुग्ण आढळले. तर ५ जणांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत ४६७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३६,१३१ झाली आहे. यामध्ये ५२०१ रुग्ण उपचार घेत असून ३०,१९१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  आतापर्यत ७३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवीन रूग्णांमध्ये कल्याण पूर्व  ५६, कल्याण प.१२६, डोंबिवली पूर्व ११०, डोंबिवली प. ५९, मांडा टिटवाळा  ३७, मोहना ५, तर पिसवली येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १६७ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून १४ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ८ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, २ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, ८ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, ४ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.



हेही वाचा

इमारतींमध्ये कोरोना रोखण्याचं बीएमसीसमोर आव्हान

नव्वदी पार केलेल्या २ रूग्णांची कोरोनावर मात



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा