Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
58,76,087
Recovered:
56,08,753
Deaths:
1,03,748
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,122
660
Maharashtra
1,60,693
12,207

दिलासादायक, राज्यात शुक्रवारी ३९ हजार ९२३ नवे रुग्ण

राज्यात मागील महिन्याभरापासून असलेल्या लॉकडाऊनचा परिणाम आता दिसायला लागला आहे. नव्या रुग्णांची संख्या ४० हजारांखाली गेल्याने दिलासा मिळाला आहे.

दिलासादायक, राज्यात शुक्रवारी ३९ हजार ९२३ नवे रुग्ण
SHARES

राज्यात मागील महिन्याभरापासून असलेल्या लॉकडाऊनचा परिणाम आता दिसायला लागला आहे.  नव्या रुग्णांची संख्या ४० हजारांखाली गेल्याने दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी राज्यात ३९ हजार ९२३ नवीन रुग्ण आढळले.  तर ५३ हजार २४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

मुंबईत १६५७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर २५७२ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत एकूण  ६ लाख ३१ हजार ९८२ रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर  ९२ टक्के आहे. सध्या मुंबईत ३७६५६ सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा कालावधी १९९ दिवसांवर गेला आहे. 

नव्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा ५३ लाख ९ हजार २१५ वर गेला आहे. यापैकी ४७ लाख ७ हजार ९८० रुग्ण बरे झाले आहेत.  तर आतापर्यंत ७९ हजार ५५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ५ लाख १९ हजार २५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.६८ टक्के आहे. तर मृत्यूदर १.५ टक्के आहे.

शुक्रवारी ६९५ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ३११ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १४२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २४२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. 

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,०६,०२,१४० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५३,०९,२१५ (१७.३५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३४,८२,४२५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. २८,३१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.हेही वाचा -

  1. बापरे! मुंबईतील 'या' भागात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या

  2. परराज्यातील मालवाहतूक वाहन चालकांना कोरोना चाचणी बंधनकारक
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा