Advertisement

कल्याण डोंबिवलीमध्ये ४२४ नवे कोरोना रुग्ण

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात शुक्रवारी कोरोनाचे नवीन ४२४ रुग्ण आढळले. तर ८ जणांचा मृत्यू झाला.

कल्याण डोंबिवलीमध्ये ४२४ नवे कोरोना रुग्ण
SHARES

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात शुक्रवारी कोरोनाचे नवीन ४२४ रुग्ण आढळले.  तर ८ जणांचा मृत्यू झाला.  पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या आता २५,९८४ झाली आहे.

सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात ३१६८ रुग्ण उपचार घेत आहेत. शुक्रवारी ३७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत २२,२७८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ५३८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजच्या ४२४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ७८, कल्याण पश्चिम ११२, डोंबिवली पूर्व १४३, डोंबिवली पश्चिम ७५, मांडा टिटवाळा १३, तर मोहना येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ९२ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १० रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, १३ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, ३ रुग्ण होलीक्रॉस रुग्णालयातून, ६ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून, ४ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, ९ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.


हेही वाचा -

कोरोनाच्या कॉलर ट्यूनमुळे मनसे नेता त्रस्त, ट्विट करून...

Ganesh Festival 2020: 'गणपतीसाठी कोकणात जाण्यावर घातलेले निर्बंध योग्यच'




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा