Advertisement

कोरोनाच्या कॉलर ट्यूनमुळे मनसे नेता त्रस्त, ट्विट करून...

कोरोना कॉलर ट्यूनला अक्षरश: सगळेजण वैतागले आहेत. त्यामुळे ही कॉलर ट्यून बंद करण्याची मागणी सगळेच जण करत आहेत.

कोरोनाच्या कॉलर ट्यूनमुळे मनसे नेता त्रस्त, ट्विट करून...
SHARES

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून जनजागृतीसाठी सगळ्यांच्या मोबाईल फोनवर कॉलर ट्यून सुरू करण्यात आली. पण या कॉलर ट्यूनला अक्षरश: सगळेजण वैतागले आहेत. त्यामुळे ही कॉलर ट्यून बंद करण्याची मागणी अनेकदा केली जात आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील ही कॉलर ट्यून तातडीनं बंद करण्याची मागणी केली आहे.

कोरोनाच्या संकटात जनजागृती करण्यासाठी कॉलर ट्यून सगळ्यांच्या फोनवर चालू करण्यात आली होती. पण आता कोरोनासंदर्भात लोकांमध्ये जनजागृती झाली आहे. त्यामुळे आता इतर जाहिरातींच्या माध्यमातून जागृती करा असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. यासंबंधी त्यांनी एक ट्विटदेखील केलं आहे.

'कोरोना संदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागानं गेली अनेक महिने कॉलर ट्यून म्हणून कोरोनाची माहिती देण्यात येत आहे. परंतु आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे. या कॉलर ट्यूनमुळे अनेकदा महत्त्वाचे फोन असलेतरी विलंब होतो अथवा लागत नाही,' असं त्यांनी ट्वीट केलं आहे.

हेही वाचा : Raj Thackeray: मॉल उघडले तर मंदिरं का नाहीत?- राज ठाकरे

आणखी एक ट्वीट करत ते म्हणाले की, 'त्यामुळे जी काही जनजागृती करायची ती विविध माध्यमातून जाहिरातीद्वारे होतच आहे. त्यामुळे आता ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी.'

मनसे नेता बाळा नांदगावकर हे एकटे नाहीत ज्यांनी यया कॉलर ट्यूनच्या बंदीची मागणी केली आहे. यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी देखील कोरोनाची कॉलर ट्यून बंद करण्याची मागणी केली होती. एकूणच काय तर सामान्य नागरिकांसोबतच राजकीय नेते देखील या ट्यूनला कंटाळले आहेत.



हेही वाचा

मुंबईचा मृत्यूदर देशापेक्षा अधिक असणं चिंताजनक- देवेंद्र फडणवीस

‘महाराष्ट्र पोलिसांना बदनाम केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना 'साष्टांग दंडवत’

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा