Advertisement

‘महाराष्ट्र पोलिसांना बदनाम केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना 'साष्टांग दंडवत’

भाजपकडून महाराष्ट्र सरकारवर अत्यंत तिखट शब्दांत टीका टिप्पणी करण्यात येत आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहीत पवार यांनीही आपल्या शैलीत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

‘महाराष्ट्र पोलिसांना बदनाम केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना 'साष्टांग दंडवत’
SHARES

सर्वोच्च न्यायालयाने अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिल्यापासून भाजपकडून महाराष्ट्र सरकारवर अत्यंत तिखट शब्दांत टीका टिप्पणी करण्यात येत आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहीत पवार यांनीही आपल्या शैलीत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (ncp mla rohit pawar criticises bjp leaders in maharashtra for notoriety of mumbai police in sushant singh rajput suicide case)

भाजप नेत्यांकडून सातत्याने मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तसंच राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांवर दबाव टाकण्यात येत असल्याचाही आरोप वारंवार केला. पाटणा इथं दाखल करण्यात आलेला गुन्हा मुंबईत हस्तांतरीत करण्यासाठी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने केलेल्या याचिकेवर निकाल देताना मुंबई पोलिसांनी गोळा केलेले पुरावे आणि दस्तावेज सोपवून सीबीआयला सहकार्य करावं, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानंतर तर या आरोपांना धार चढली. 

हेही वाचा - मुंबई पोलिसांना काम करू न देणारा सरकारमधील व्यक्ती कोण?- आशिष शेलार

परंतु सोबतच न्यायालयासमोर सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे प्रथमदर्शी मुंबई पोलिसांनी काही चुकीचं केलं आहे, असं म्हणता येणार नाही. केवळ बिहारच्या पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाइन करण्याचा निर्णय अयोग्य होता. हे टाळता आलं असतं. परंतु  यामुळे तपासाबाबत संशयाला जागा मिळाली. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी केवळ अपघाती मृत्यूचा गुन्हा नोंदवला होता. त्यामुळे या चौकशीला अधिकाराच्या मर्यादा होत्या. तर बिहारमध्ये पूर्ण गुन्हा नोंदवण्यात आला असून तो आधीपासूनच सीबीआयकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआयने केली पाहिजे, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं. 

हाच धागा पकडून सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नसल्याचं न्यायालयानेच स्पष्ट केलं हे बरं झालं. पण यानिमित्ताने बिहारची राजकीय पोळी भाजण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी करण्याचं 'उदात्त' कार्य केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना 'साष्टांग दंडवत', असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहीत पवार यांनी भाजपच्या नेत्यांना खडेबोल सुनावले. 

तसंच आधी 'कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा' आणि राज्यातील सत्ता गमावल्यानंतर 'मेरा अंगण मेरा रणांगण' या घोषणेतून तर आता सुशांत सिंह प्रकरणातून भाजपाने राज्याचा नावलौकिक घालवण्याचंच काम केलं. 'अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही.' असं म्हणत संतापही व्यक्त केला आहे.

हेही वाचा - सरकारने आता आत्मचिंतन करावं, नारायण राणेंचा सल्ला 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा