Advertisement

मुंबई पोलिसांना काम करू न देणारा सरकारमधील व्यक्ती कोण?- आशिष शेलार

सरकारने सीबीआयच्या तपासाला सहकार्य केलं पाहिजे अन्यथा जनप्रक्षोभाला सामोरे जावं लागेल, असा इशारा भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारला दिला आहे.

मुंबई पोलिसांना काम करू न देणारा सरकारमधील व्यक्ती कोण?- आशिष शेलार
SHARES

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आतापर्यंत राज्य सरकारने लपवाछपवी केली. पण सुशांतच्या केसचा तपास सीबीआयला देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे यापुढे सरकारने सीबीआयच्या तपासाला सहकार्य केलं पाहिजे अन्यथा जनप्रक्षोभाला सामोरे जावं लागेल, असा इशारा भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारला दिला आहे. (maharashtra government must cooperate cbi for investigation of sushant singh rajput suicide case says bjp mla ashish shelar)

याप्रकरणी बोलताना आशिष शेलार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. सुरूवातीपासूनच आम्ही म्हणत होतो की ज्या पद्धतीने या चौकशीला अयोग्य दिशेने मुंबई पोलीस घेऊन जातंय, त्याच्या मागचा बोलविता धनी आणि त्याच्या मागचा हात कोणाचा आहे? आम्हाला याचंच स्पष्टीकरण आणि उत्तर हवं आहे. सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांना योग्य दिशेने काम करू दिलं जात नव्हतं, ही आमच्या मनातली शंका आहे. म्हणून राज्य सरकारमध्ये बसलेल्या पक्षांना आम्ही खडसावतोय आणि खबरदारीचा इशारा देखील देतोय की यापुढे सीबीआय जेव्हा चौकशीला सुरूवात करेल तेव्हा सकारात्मक भूमिका घ्या. कारण एनआयएला जाणाऱ्या एका प्रकरणामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीचं नवीन सरकार आल्यानंतर त्याच्याही विरोधात तुम्ही भूमिका घेतली होती. आज ईडी ज्यावेळेला सुशांत सिंह राजपूत प्रकरणात चौकशी करतंय त्यावेळेला सुद्धा दस्तावेज आणि पुरावे ईडीला देण्यामध्ये तुम्ही जास्त वेळ घेतला हेसुद्धा स्पष्ट होतंय. त्यामुळे याच पद्धतीने सीबीआय चौकशीत जर विघ्न आणण्याचं काम केलं तर खबरदार, असं आशिष शेलार यांनी खडसावलं.

हेही वाचा - सरकारने आता आत्मचिंतन करावं, नारायण राणेंचा सल्ला

आज कोट्यवधी भारतवासी आणि सुशांत सिंहचा परिवार न्यायाची वाट पाहातोय. त्यामध्ये अडथळा आणू नका हे आमचं त्यांना आवाहन आहे. या सगळ्या चौकशीमध्ये खऱ्या अर्थाने वेळ का लागला? एफआयआर वेळेत का नाही नोंदवला गेला? एफआयआर नोंदवण्यासाठीचा तपास योग्य वेळेत का नाही झाला? जे महत्त्वाचे साक्षीदार होते, त्यांचे जबाब का नाही नोंदवण्यात आले? ज्या मेंटल थेरपीस्टचा जबाब नोंदवण्यात आला, त्याला भारतात प्रॅक्टीस करण्याची परवानगी होती की नव्हती, याची चौकशी का करण्यात आली नाही? यावरून हे स्पष्ट दिसून येतं की राज्य सरकारमध्ये बसलेली कुठली तरी व्यक्ती लपवा छपवीचा खेळ करतंय आणि त्या लपवाछपवीचा परिणाम मुंबई पाेलिसांना भोगावा लागतोय. म्हणून पब आणि पार्टी गँग खबरदार तुम्हाला सुद्ध या सगळ्याचं उत्तर द्यावं लागेल, असं आशिष शेलार म्हणाले.

पोलिसांनी ठरवलं तर मंदिरासमोरची चप्पल पण चोरीला जाऊ शकत नाही!"  "सिंघम" चा हा डायलॉग शंभर टक्के खरा आहे. पण सुशांत सिंग रजपूतच्या केसमध्ये मुंबई पोलिसांनी का ठरवले नाही? कुणी त्यांना ठरवू दिले नाही? कुणी त्यांना त्यांच्या नाव-लौकिक, ख्यातीप्रमाणे काम करु दिले नाही? कुणी, मुंबई पोलिसांना बोलू दिले नाही? पोलिसांचे हात कायद्याने बांधलेले असतात,पण सुशांतच्या केसमध्ये अन्य कोणी पोलिसांचे हात बांधले होते का? सर्वोच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे दिला. याप्रकरणी आमच्या मुंबई पोलिसांना जी लपवाछपवी करावी लागली त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार का? असे अनेक प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केले.

हेही वाचा - कोणाला वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते? भाजपचा प्रश्न

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा