Advertisement

Raj Thackeray: मॉल उघडले तर मंदिरं का नाहीत?- राज ठाकरे

शासकीय नियमांचं पालन करून मंदिरं सुरू करता येणार नाहीत का? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

Raj Thackeray: मॉल उघडले तर मंदिरं का नाहीत?- राज ठाकरे
SHARES

राज्यात मिशन बिगीन अंतर्गत हळुहळू सर्व गोष्टी सुरू होत आहे. माॅलही सुरू झाले आहेत. मग मंदिरं अजूनही का उघडली जात नाहीत. शासकीय नियमांचं पालन करून मंदिरं सुरू करता येणार नाहीत का? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. त्र्यंबकेश्वरमधील १० पुजाऱ्यांनी सोमवार १७ आॅगस्ट रोजी राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी हा प्रश्न उपस्थित केला. (mns chief raj thackeray demands to open temples in maharashtra)

कोरोनाला घाबरून चालणार नाही, त्यामुळे सावधिरी बाळगून आता लाॅकडाऊन पूर्णपणे उठवायला हवं, अशी भूमिका राज ठाकरे यांनी याआधी मांडली होती.

लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे मागील ५ महिन्यांपासून बंद आहेत. प्रार्थना स्थळाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक जमल्यास कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, हे लक्षात घेऊन अद्याप प्रार्थनास्थळे उघडण्यास सरकारने परवानगी दिलेली नाही. बहुसंख्या प्रार्थनास्थळांना लागूनच लहान-मोठे व्यावसायिक प्रसाद, फुले, पूजा साहित्य व इतर संबंधित वस्तूंची विक्री करून आपला उदरनिर्वाह करत असतात. परंतु प्रार्थनास्थळं बंद असल्याने मंदिर परिसरातील छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी त्र्यंबकेश्वरमधील १० पुजाऱ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

हेही वाचा- Raj Thackeray: जीम सुरू करा, बघू काय होतं ते- राज ठाकरे


यावेळी पुजाऱ्यांसोबत चर्चा करताना मॉल उघडले तर मंदिरं का नाहीत? असा प्रश्न विचारतानाच शासकीय नियमांचं पालन करूनच मंदिरं खुली व्हावीत, पण मंदिरं सुरू केल्यानंतर भाविकांची झुंबड उडाल्यास तुम्ही काय कराल? भाविकांची गर्दी कशी रोखाल? करोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून गर्दीवर कसं नियंत्रण आणाल? असे काही प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. तसंच मंदिरं सुरू केल्यानंतर इतर धर्मिय नियम पाळतील काय? हा मुद्दा देखील त्यांनी उपस्थित केला. यासंदर्भात २ दिवसांत सरकारशी बोलण्याचं आश्वासनही राज ठाकरे यांनी पुजाऱ्यांना दिलं. 

दरम्यान काही दिवसांपूर्वी एका याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने मंदिरं उघडायचीच असती, तर आधी न्याय देवतेचं मंदिर का उघडायला नको? असा प्रश्न विचारत याचिकार्त्यांना पुनर्विचार करायला लावलं होतं. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा