Advertisement

एक उमदा दिग्दर्शक गमावला, राज ठाकरे भावूक

राज ठाकरे यांनी सविस्तर पोस्ट लिहून आपल्या मित्राला श्रद्धांजली वाहिली आहे.

एक उमदा दिग्दर्शक गमावला, राज ठाकरे भावूक
SHARES

सिनेक्षेत्राची उत्तम जाण असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे या कलाविश्वातील असंख्य मित्र देखील आहेत. दिवंगत दिग्दर्शक निशिकांत कामत हे देखील यापैकीच एक. निशिकांत कामत यांच्या अकाली निधनाने जसा सर्वांनाच धक्का बसला, तसाच राज ठाकरे यांनाही. राज ठाकरे यांनी सविस्तर पोस्ट लिहून आपल्या मित्राला श्रद्धांजली वाहिली आहे. (mns chief raj thackeray facebook post on nishikant kamat)

आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे लिहितात, निशिकांत कामतच्या निधनाने आपण एक उमदा दिग्दर्शक गमावला. निशिकांतचं सिनेमावर मनापासून प्रेम होतं. दृश्यस्वरूपात सांगायची गोष्ट म्हणजे सिनेमा... हे मराठीतील ज्या अगदी बोटावर मोजता येतील इतक्या मोजक्याच दिग्दर्शकांना कळलं होतं आणि ज्यांना स्वतःची गोष्ट ताकदीने दृश्य स्वरूपात मांडता यायची त्यात निशिकांत होता.

हेही वाचा - दिग्दर्शक-अभिनेता निशिकांत कामत यांचं निधन


प्रत्येक दशकाचा एक 'कल्ट' सिनेमा असतो तसा 'डोंबिवली फास्ट' हा मागच्या दशकातील मराठीतील कल्ट सिनेमा होता. राजकीय-सामाजिक स्थित्यंतरांमध्ये सामान्य माणूस घुसमटत असतो, त्यातून त्याचा स्वतःशीच संघर्ष सुरु होतो, ह्याचं भान निशिकांत मधल्या दिग्दर्शकाला होतं. सामान्य माणसांच्या आक्रोशाचा मराठीतील 'डोंबिवली फास्ट' मधून सुरु झालेला प्रवास हिंदीतल्या 'मुंबई मेरी जान' मध्ये पण सुरु राहिला.

मराठी सोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही ज्या मोजक्या दिग्दर्शकांकडे दीर्घ टप्पा गाठायची क्षमता होती त्यात निशिकांत होता. निशिकांतच्या जाण्याने मी एक चांगला मित्र गमावलाच पण सिनेमावर भरभरून बोलणारा एक रसिक देखील गमावला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निशिकांतला भावपूर्ण श्रद्धांजली. अशा शब्दांत राज ठाकरे यांनी निशिकांत कामत यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

हेही वाचा - Raj Thackeray: मॉल उघडले तर मंदिरं का नाहीत?- राज ठाकरे
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा