Advertisement

राज्यात डेल्टा प्लसचे आढळले ४५ रुग्ण

डेल्टा प्लस व्हेरिएंटचे सर्वाधिक २० रुग्ण १९ ते ४५ वयोगटात आढळले असून त्याखालोखाल ४६ ते ६० वयोगटातील १४ रुग्ण आहेत.

राज्यात डेल्टा प्लसचे आढळले ४५ रुग्ण
SHARES

राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे ४५ रुग्ण आढळून आले आहेत. राज्य एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाच्या रविवारच्या अहवालात हे स्पष्ट झाले. 

डेल्टा प्लसचे सर्वाधिक १३ रुग्ण जळगाव जिल्ह्यात आढळले आहेत. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात १३, मुंबईत ६ व पुण्यात ३ रुग्ण आढळले आहेत. तर पालघर, औरंगाबाद, बीड, नंदुरबार, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर आदी जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

डेल्टा प्लस व्हेरिएंटचे सर्वाधिक २० रुग्ण १९ ते ४५ वयोगटात आढळले असून त्याखालोखाल ४६ ते ६० वयोगटातील १४ रुग्ण आहेत. १८ वर्षांखालील ६ बालके आणि ६० वर्षांवरील ५ रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे ४५ पैकी ३४ रुग्णांची माहिती प्राप्त झाली असून रत्नागिरीतील एका रुग्णाच्या मृत्यूचा अपवाद वगळता डेल्टा प्लस रुग्णांमधील आजाराचे स्वरूप सौम्य ते मध्यम स्वरूपाचे आहे.

या तपासणीतून राज्यात ८० टक्क्यांहून अधिक नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळत असल्याचे दिसून येते. तसेच डेल्टा प्लस रुग्ण आढळलेल्या जिल्ह्यात रुग्णांची सविस्तर माहिती घेतली जात आहे. त्यामध्ये रुग्णांच्या प्रवासाचा इतिहास, त्यांचे लसीकरण, त्यांच्या आजाराचे स्वरूप, त्यांच्या सहवासातील कोणाला कोरोनासदृश लक्षणे आहेत का याची माहिती घेणे आणि लसीकरणानंतर कोरोना झाल्यास त्याचे नमुने घेणे, आदी बाबींचा समावेश आहे. 

कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनचा मिक्स डोस लोकांना अधिक फायदेशीर ठरत आहे. याचा परिणाम एखाद्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन डोसपेक्षा अधिक प्रभावी आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) हा दावा केला आहे. कोविशील्ड किंवा कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या लोकांमध्ये निर्माण झालेल्या प्रतिकारशक्तीचा अभ्यास करून या संस्थांनी हा निष्कर्ष काढला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा