Advertisement

नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन ५३ रुग्ण

नवी मुंबईत मंगळवारी (१२ जानेवारी) कोरोनाचे नवीन ५३ रुग्ण सापडले आहेत. मंगळवारी नवी मुंबईत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन ५३ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत मंगळवारी (१२ जानेवारी) कोरोनाचे नवीन ५३ रुग्ण सापडले आहेत. मंगळवारी  नवी मुंबईत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ५१ हजार ८४१ झाली आहे.

नवी मुंबईमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर ७, नेरुळ ५, वाशी १३, तुर्भे ८, कोपरखैरणे ९, घणसोली २, ऐरोली ९, दिघा येथील २ रुग्णांचा समावेश आहे. तर ९४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

बेलापूर २८, नेरुळ ८, वाशी १६, तुर्भे ८, कोपरखैरणे ६,  घणसोली ९, ऐरोली १७, दिघा येथील २ रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४९,९३९ झाली आहे. तर मृतांचा आकडा १०७० झाला आहे. नवी मुंबईत सध्या ८३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९६ टक्के झाला आहे. 

नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत डिसेंबर महिन्यात चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले. नोव्हेंबर महिन्यात ७२,७७१ चाचण्या करण्यात आल्या होत्या, त्यात वाढ करीत डिसेंबर महिन्यात ८०,६२४ चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. 



हेही वाचा -

प्रदूषणाच्या पातळीत वाढ; मुंबईत ‘हेल्थ अलर्ट’ जारी

प्रवाशांच्या हलगर्जीपणामुळं लॉकडाऊनमध्येही रेल्वे दुर्घटनांचे सत्र सुरूच



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा