Advertisement

दोन आठवड्यानंतर राज्यात रुग्णसंख्या ६० हजारांखाली

राज्यात सध्या ६ लाख ६८ हजार ३५३ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,७६,५२,७५ चाचण्यांपैकी ४७ लाख २२ हजार ४०१ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

दोन आठवड्यानंतर राज्यात रुग्णसंख्या ६० हजारांखाली
SHARES

राज्यात दोन आठवड्यानंतर कोरोना रुग्णांचा आकडा ६० हजारांच्या खाली आला आहे. रविवारी ५६ हजार ६४७ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर  ६६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रविवारी ५१ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण ३९ लाख ८१ हजार ६५८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८४. ३१ टक्के झालं आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १. ४९ टक्के इतका झाला आहे. आतापर्यंत  ७० हजार २८४ रुग्णांचे प्राण दगावले आहेत.

राज्यात सध्या ६ लाख ६८ हजार ३५३ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,७६,५२,७५ चाचण्यांपैकी ४७ लाख २२ हजार ४०१ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. तर, राज्यात सध्या ३९ लाख ९६ हजार ९४६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर २७ हजार ७३५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा