राज्यातील कोरोनाचा फैलाव कमी होताना दिसत नाही. रविवारी तब्बल ५७ हजार ७४ नवीन रुग्ण आढळले. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारकडून विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यानुसार शुक्रवारी रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत कडक निर्बंध लावण्यात येणार आहेत.
रविवारी २२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २७ हजार ५०८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत २५ लाख २२ हजार ८२३ रुग्ण बरे झाले आहेत. तर ५५ हजार ८७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ४ लाख ३० हजार ५०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सध्या राज्यातील करोना मृत्यूदर १.८६ % आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ५ लाख ४० हजार १११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३० लाख १० हजार ५९७ (१४.६६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२,०५,८९९ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर १९,७११ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात रविवारी १६९३ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला. ९८१ रुग्ण बरे झाले आहेत. येथे सध्या १० हजार ३०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत ७२ हजार ५३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
ठाण्यात १ हजार ७०१ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. तर ५ मृतांची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात १४०८ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. सध्या येथे ११ हजार ८०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा
कोरोनाग्रस्तांनी मदतीसाठी 'वॉर्ड वॉर रूम'शी संपर्क साधावा
महाराष्ट्रात कठोर निर्बंध; शुक्रवार ते सोमवार संपूर्ण लॉकडाऊन