Advertisement

राज्यात रविवारी ५९ हजार रुग्ण बरे

रुग्णसंख्या घटत असली तरी मृतांची संख्या कमी होत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

राज्यात रविवारी ५९ हजार रुग्ण बरे
SHARES

राज्यात रविवारी ३४,३८९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल ५९ हजार ३१८ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्णसंख्या घटत असली तरी मृतांची संख्या कमी होत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

रविवारी ९७४ मृतांची नोंद झाली आहे. आतापर्यंत ८१ हजार ४८६ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५२ टक्के आहे. तर आतापर्यंत ४८ लाख २६ हजार ३७१ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. 

मुंबईत रविवारी १५४४ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर २४३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९२ टक्के झाला आहे. मुंबईत सध्या ३५७०२ सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा कालावधी २३१ दिवसांवर गेला आहे. मुंबईत रुग्ण वाढीचा दर  ९ मे ते १५ मे या कालावधी ०.२९ टक्के राहिला आहे. 

सध्या राज्यात ४ लाख ६८ हजार १०९ रुग्णांवर राज्यात उपचार सुरू आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,११,०३,९९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५३,७८,४५२ (१७.२९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३४,९१,९८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. २८,३९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा