राज्यात सोमवारी कोरोनाचे नवीन ६ हजार १७ रुग्ण आढळले. तर १३ हजार ५१ रूग्ण बरे झाले आहेत. तसंच ६६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण ५९,९३,४०१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.३५ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४, ५६, ४८, ८९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,२०,२०७ (१३.६३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,६१,७९६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,०५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ९६,३७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुंबई महापालिका क्षेत्रात ४०२ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर ५७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर १४ रुग्ण दगावले असून आतापर्यंत १५ हजार ७१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ हजार ३४९ आहे.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील
- मुंबई मनपा ४०३
- ठाणे ६०
- ठाणे मनपा ७०
- नवी मुंबई मनपा ८०
- कल्याण डोंबवली मनपा ५५
- उल्हासनगर मनपा ११
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा ४०
- पालघर १४
- वसईविरार मनपा ३०
- रायगड २२४
- पनवेल मनपा १०४
- ठाणे मंडळ एकूण १०९२
- नाशिक ६५
- नाशिक मनपा ३२
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर ४२७
- अहमदनगर मनपा १२
- धुळे २
- धुळे मनपा ०
- जळगाव ३
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार १
- नाशिक मंडळ एकूण ५४३
- पुणे ४३६
- पुणे मनपा २०२
- पिंपरी चिंचवड मनपा १७८
- सोलापूर २८६
- सोलापूर मनपा ११
- सातारा ५४५
- पुणे मंडळ एकूण १६५८
- कोल्हापूर ९०४
- कोल्हापूर मनपा २०४
- सांगली ७९५
- सांगली मिरज कुपवाड मनपा १५०
- सिंधुदुर्ग १६९
- रत्नागिरी २२१
- कोल्हापूर मंडळ एकूण २४४३
- औरंगाबाद १२
- औरंगाबाद मनपा ७
- जालना १
- हिंगोली ०
- परभणी १
- परभणी मनपा २
- औरंगाबाद मंडळ एकूण २३
- लातूर ९
- लातूर मनपा ४
- उस्मानाबाद ७४
- बीड ११४
- नांदेड ५
- नांदेड मनपा २
- लातूर मंडळ एकूण २०८
- अकोला २
- अकोला मनपा २
- अमरावती ५
- अमरावती मनपा २
- यवतमाळ २
- बुलढाणा ७
- वाशिम ४
- अकोला मंडळ एकूण २४
- नागपूर १
- नागपूर मनपा ८
- वर्धा ०
- भंडारा ०
- गोंदिया २
- चंद्रपूर २
- चंद्रपूर मनपा २
- गडचिरोली ११
- नागपूर एकूण २६