Advertisement

नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन ६० रुग्ण

नवी मुंबईत मंगळवारी (२९ डिसेंबर) कोरोनाचे नवीन ६० रुग्ण सापडले आहेत. तर २ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन ६० रुग्ण
SHARES

नवी मुंबईत मंगळवारी (२९ डिसेंबर) कोरोनाचे नवीन ६० रुग्ण सापडले आहेत. तर २ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ५० हजार ८५१ झाली आहे. 

मंगळवारी नवी मुंबईमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर ८, नेरुळ १३, वाशी १०, तुर्भे ३, कोपरखैरणे ५, घणसोली ९, ऐरोली १० , दिघा येथील २ रुग्णांचा समावेश आहे. तर ९१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

बेलापूर १७, नेरुळ ३०, वाशी ९, तुर्भे ७, कोपरखैरणे ६, घणसोली ६, ऐरोलीतील ७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४८, ९१३ झाली आहे. तर मृतांचा आकडा १०४८ झाला आहे. नवी मुंबईत सध्या ८९० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९६ टक्के झाला आहे. 

नवी मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या आता घटत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे पालिकेने शहरातील सर्व विभागांत उभारलेली १२ काळजी केंद्र टप्प्याटप्प्याने बंद केली आहेत. वाशी येथील पालिका रुग्णालयही सामान्य केले असून आता वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात उपचार होणार आहेत. तर अत्यवस्थ रुग्णांसाठी डॉ.डी.वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुविधा सुरू ठेवण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून नवीन रुग्ण संख्या शंभरच्या आत आहे. त्यामुळे पालिकेने १३ कोरोना काळजी केंद्रापैकी ९ केंद्रे पालिकेने अगोदरच बंद केली होती. आता उरलेल्या चारपैकी तीन केंद्रांत नव्याने प्रवेश बंद केला असून एकाच ठिकाणी उपचार केले जात आहेत. 



हेही वाचा -

कोरोनाबाधितांसाठी आरोग्य व्यवस्था उभारण्याकरिता महापालिकेला आतापर्यंत १,४७० कोटींचा खर्च

'फ्री' काश्मिर प्रकारणात पोलिसांकडून ‘सी’ समरी अहवाल सादर



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा