Advertisement

तळोजामधील वृद्धाश्रमातील ६६ वृद्धांनी केली कोरोनावर मात

पनवेल पालिकेची खारघर आणि कळंबोली येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राची वैद्यकीय टीम १४ दिवस सकाळ-संध्याकाळ दोन वेळेला या वृद्धांश्रमामध्ये जाऊन त्यांची तपासणी करून उपचार करत होती.

तळोजामधील वृद्धाश्रमातील ६६ वृद्धांनी केली कोरोनावर मात
SHARES

तळोजा येथील परमशांतीधाम वृद्धाश्रमातील ६६ वृद्ध कोरोनातून बरे झाले आहेत. पनवेल महापालिका प्रशासनाने १४ दिवस घेतलेल्या अथक प्रयत्नांमुळे त्यांना कोरोनावर मात करण्यात यश आलं आहे. 

तळोजा एमआयडीसीमधील परमशांतीधाम वृद्धांश्रमातील वृध्दांना १४ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्याची माहिती कळताच महापालिकेने आपले वैद्यकीय पथक त्या ठिकाणी पाठवलं.  यानंतर सगळ्यांची चाचणी केल्यानंतर ६८ वृद्धांपैकी ६६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं . त्यातील १६ जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. पालिकेने त्यांना तात्काळ एमजीएम रुग्णांलयात बेड उपलब्ध करून दिले. या वृद्धाश्रमातील बहुतांश वृद्धांना जवळचे कोणीच नातेवाईक नसल्याने पालिकेने या वृद्धांचीसर्व जबाबदारी घेतली.

पनवेल पालिकेची खारघर आणि कळंबोली येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राची वैद्यकीय टीम १४ दिवस सकाळ-संध्याकाळ दोन वेळेला या वृद्धांश्रमामध्ये जाऊन त्यांची तपासणी करून उपचार करत होती.तसेच त्यांना लागणार्‍या सर्व औषधांचा पुरवठाही पालिकेच्या वैद्यकिय विभागाच्यावतीने करण्यात येत होता. 

अवघ्या काही दिवसात पालिकेच्या अथक प्रयत्नाने इथल्या वृद्धांनी कोरोनावर मात केली. सगळे रुग्ण आता ठणठणीत बरे झाले आहे. पालिकेने दिलेल्या सहकार्याबद्दल येथील परमशांतीधाम वृद्धाश्रमाचे अबानंदगिरी महाराजांनी महापालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.हेही वाचा

मास्कविना फिरणाऱ्यांकडून ५४ कोटींचा दंड वसूल

मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा