Advertisement

राज्यात बुधवारी ६७ हजार ४६८ नवे रुग्ण

राज्यात आजपर्यंत एकूण ३२ लाख ६८ हजार ४४९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (८१.१५ टक्के एवढे आहे.

राज्यात बुधवारी ६७ हजार ४६८ नवे रुग्ण
SHARES

राज्यात बुधवारी कोरोनाचे नवीन ६७ हजार ४६८ रुग्ण आढळले. तर  ५६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  ५४ हजार ९८५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

राज्यात आतापर्यंत ६१ हजार ९११ जणांचा मृत्यू झाला आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर १.५४ टक्के आहे.  राज्यात आजपर्यंत एकूण ३२ लाख ६८ हजार ४४९  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (८१.१५ टक्के एवढे आहे. 

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ४६ लाख १४ हजार ४८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४० लाख २७ हजार ८२७ (१६.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९,१५,२९२ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर २८ हजार ३८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यात सध्या ६ लाख ९५ हजार ७४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सर्वाधिक १ लाख २१ हजार २८४ ॲक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. मुंबई पालिका क्षेत्रात ८३ हजार ४५० अॅक्टिव्ह रुग्ण असून नागपूर जिल्ह्यात हा आकडा ८० हजार १५५ इतका झाला आहे. ठाणे जिल्ह्यात ७८ हजार ४७३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर नाशिक जिल्ह्यात ४६ हजार २५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 



हेही वाचा -

रेल्वेच्या 'त्या' शूर कर्मचाऱ्याला जावा कंपनीकडून ही खास भेट

मुंबईतील मशिदी कोरोना रुग्णांना पुरवत आहेत मोफत ऑक्सिजन

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा