Advertisement

७ महिन्यांच्या अरिबाने गिळला एलईडी बल्ब!

चिपळूणमध्ये राहणाऱ्या ७ महिन्यांच्या अरिबाने खेळता खेळता चुकून आख्खा एलईडी बल्बच गिळला. तिच्या आई-वडिलांना वाटलं की, तिने दोरा किंवा मोबाईलची पिन गिळली असावी. पण, त्यानंतर तिला सतत खोकला आणि ताप यायला लागला. कुटुंबियांनी भीतीपोटी अरिबाला तिथल्या स्थानिक डॉक्टरांकडे दाखवलं. पण, तिची प्रकृती सुधारत नव्हती.

७ महिन्यांच्या अरिबाने गिळला एलईडी बल्ब!
SHARES

लहान बाळ जन्माला आल्यानंतर आई-वडिलांना सतत त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं. थोडंसं जरी दुर्लक्ष झालं, तरी मुलं काय करुन ठेवतील याचा अंदाजच येत नाही. तसंच काहीसं घडलं ७ महिन्यांच्या अरिबासोबत.


एलईडी बल्ब अडकला अरिबाच्या फुफ्फुसात

चिपळूणमध्ये राहणाऱ्या ७ महिन्यांच्या अरिबाने खेळता खेळता चुकून आख्खा एलईडी बल्बच गिळला. तिच्या आई-वडिलांना वाटलं की, तिने दोरा किंवा मोबाईलची पिन गिळली असावी. पण, त्यानंतर तिला सतत खोकला आणि ताप यायला लागला. कुटुंबियांनी भीतीपोटी अरिबाला तिथल्या स्थानिक डॉक्टरांकडे दाखवलं. पण, तिची प्रकृती सुधारत नव्हती.


अवघ्या दोन मिनिटांमध्ये काढला बल्ब

एक्स-रे आणि इतर काही तपासण्या केल्या तेव्हा तिच्या उजव्या बाजूच्या फुप्फुसामध्ये बाह्यघटक असल्याचं आढळून आलं. चिपळूणच्या डॉक्टरांनी तिला मुंबईला नेण्याचा सल्ला दिला. आठवड्याभराने त्यांनी अरिबाला बाई जेरबाई वाडिया बालरुग्णालयात दाखल केलं. वाडियातील डॉक्टरांनी अरिबावर तपासणी करून तात्काळ उपचार सुरू केले. त्यानंतर अगदी २ मिनिटांत ब्रॉन्कोस्कोपीने हा बल्ब बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं.

अरिबाला तात्काळ आम्ही प्रतिजैविके दिली. तिची जेव्हा ब्रॉन्कोस्कोपी केली, तेव्हा तो बल्ब बरेच दिवस तिथे राहिल्याने संपूर्ण फुफ्फुसात कणिका उती (उतीचे कण) आढळून आल्या. हा संसर्ग काढून टाकण्यासाठी इंट्राव्हेनस (थेट नसमधून) प्रतिजैविके आणि स्टेरॉइड्स देण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा ब्रॉन्कोस्कोपी केली आणि दोन मिनिटांत हा बाह्यघटक (स्कोपमधून केवळ एक वायर दिसत होती) फोरसेप्सचा वापर करून काढण्यात आला.

डॉ. दिव्या प्रभावत, इएनटी विभाग प्रमुख, वाडिया रुग्णालय


वाडिया रूग्णालयातली दुर्मिळ केस

ब्रॉन्कोस्कोपीनंतर तो २ सेंटिमीटरचा एलईडी बल्ब असल्याचं सर्वांना समजलं. वाडिया रुग्णालयात आजपर्यंत हजारांहून जास्त स्कोपी झाल्या आहेत. पण, ही अशी पहिलीच केस असल्याचं सांगितलं जात आहे.

याविषयी अधिक माहिती देताना अरिबाचे वडील नौशद खान सांगतात, "माझ्या मुलीचा जीव वाचवल्याबद्दल मी वाडिया हॉस्पिटलच्या टीमचा अत्यंत आभारी आहे. आमच्या मुलीने एलईडी बल्ब गिळला असेल, हे आम्हाला माहीतही नव्हतं. पण इथल्या डॉक्टरांनी अचूक निदान केलं आणि तात्काळ उपचार केले."



हेही वाचा

वाडियात 'फॅक्टर 7'च्या रूग्णावर उपचार; जगभरातला दुर्मिळ आजार


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा