Advertisement

वाडियात 'फॅक्टर 7'च्या रूग्णावर उपचार; जगभरातला दुर्मिळ आजार

दीपिकाला 'फॅक्टर 7' हा दुर्मिळ आजार झाला होता. या आजारामध्ये रक्ताच्या वेगाने गुठळ्या तयार होतात. तिच्या या आजाराची आत्ता चर्चा होण्याचं कारण म्हणजे तिच्यावर वाडिया रूग्णालयात उपचार झाले. आणि वाडियातल्या डॉक्टरांनी तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून तिला जीवदान दिलं.

वाडियात 'फॅक्टर 7'च्या रूग्णावर उपचार; जगभरातला दुर्मिळ आजार
SHARES

टीबी, कॅन्सर, मधुमेह अशा गंभीर आजारांबद्दल जवळपास सगळ्यांनाच थोडीफार माहिती असते. पण असेही काही दुर्मिळ आजार असतात, ज्यांची नावंही आपण कधी ऐकली नसतात. त्यामुळे अशा आजारांबद्दल माहिती असणं तर दूरच! असाच एक आजार झाला होता कर्नाटकच्या रायचूरमध्ये राहणाऱ्या ५ वर्षांच्या दीपिकाला.



दीपिकाला 'फॅक्टर 7' हा दुर्मिळ आजार झाला होता. या आजारामध्ये रक्ताच्या वेगाने गुठळ्या तयार होतात. तिच्या या आजाराची आत्ता चर्चा होण्याचं कारण म्हणजे तिच्यावर वाडिया रूग्णालयात उपचार झाले. आणि वाडियातल्या डॉक्टरांनी तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून तिला जीवदान दिलं.



काय आहे 'फॅक्टर 7' रक्तदोष?

आपल्या रक्तात एकूण १२ वेगवेगळे फॅक्टर असतात. त्यापैकी एक असतो तो म्हणजे 'फॅक्टर 7'. 'फॅक्टर 7'ची कमतरता असणं हा रक्ताचा दोष असून त्यात जखम किंवा शस्त्रक्रिया झाल्यास खूप वेळ रक्त वाहत राहते. शिवाय, आपलं शरीर हा घटक तयार करत नाही. 'फॅक्टर 7' ही यकृतात तयार होणारी प्रथिने असतात. या प्रथिनांमुळे जखम झाल्यानंतर लागलीच रक्त साकळून रक्त वाहणं थांबण्यासाठी मदत होते. रक्त साकळण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या २൦ घटकांपैकी हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. हा रक्तदोष दर ३ ते ५ लाख बाळांमागे एका बाळात आढळतो.


दीपिकाच्या आईच्या प्रसूतीदरम्यान झालेल्या गुंतागुंतीमुळे तिच्या हातांचे मज्जातंतू ताणले गेले. त्यामुळे तिला 'ब्रेकिअल प्लेक्सस' हा हातांच्या मज्जातंतूचा आजारही झाला होता. त्यासाठी तिला वाडिया रुग्णालयात दाखल केलं गेलं. या आजाराची शस्त्रक्रिया जन्म झाल्यानंतर ३ महिन्यात करायची असते. पण, दीपिकाला तिच्या वयाच्या ५ व्या वर्षी हा त्रास जाणवू लागला. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिला बंगळूरुच्या ही अनेक डॉक्टरांकडे दाखवलं. पण, तिथे उपचार होत नाहीत हे कळल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी दीपिकाला मुंबईत आणलं आणि वाडिया रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर डॉक्टरांनी अनेक तपासण्या केल्यानंतर तिची 'ब्रेकिअल प्लेक्सस' यावरची शस्त्रक्रिया झाली. पण, तिचं रक्त थांबतच नव्हतं. तेव्हा तिला 'फॅक्टर 7' हा रक्तदोष असल्याचं समोर आलं.



दीपिका काही ठराविक मर्यादेपर्यंतच आपला उजवा हात वर-खाली करु शकत होती. तिच्या तपासण्या केल्यावर कळलं की, तिला 'ब्रेकिअल प्लेक्सस' हा आजार आहे. 'ब्रेकिअल प्लेक्सस'ची ट्रीटमेंट सुरु असतानाच तिच्या रक्तात 'फॅक्टर 7' ची कमतरता असल्याचं समजलं. म्हणून आम्ही तिला हमॅटोलॉजिस्टने 'फॅक्टर 7' देण्याचा सल्ला दिला.

डॉ. मुकुंद थत्ते, प्लास्टिक सर्जन


काय आहे 'ब्रेकिअल प्लेक्सस'?

'ब्रेकिअल प्लेक्सस' हा हातांच्या मज्जातंतूचा आजार आहे. ज्यात प्रसूतीदरम्यान झालेल्या गुंतागुंतीमुळे हातांमधील मज्जातंतू बाळ बाहेर येताना ताणले गेले असतात. जेव्हा मज्जातंतू ताणले जातात, दाबले जातात किंवा काही गंभीर प्रकरणांमध्ये पाठीच्या कण्यापासून वेगळे होतात, तेव्हा 'ब्रेकिअल प्लेक्सस' हा विकार होतो. 'ब्रेकिअल प्लेक्सस' हे मज्जातंतूंचे जाळे असते. हे जाळे पाठीच्या कण्यातील संदेश तुमच्या खांदे, बाहु आणि हातांपर्यंत पोहोचवत असते.


या शस्त्रक्रियेनंतर ४८ तासांमध्ये दर ४ तासांनी तिला 'फॅक्टर 7' चढवण्यात आलं आहे. ते सतत ८ दिवस सुरू होतं. त्यामुळे तिला होणारा रक्तस्त्राव देखील थांबला आहे. ही एक दुर्मिळ केस आहे. अशा प्रकारच्या फक्त २०० केसेस जगभरात नोंदवण्यात आल्या आहेत.

डॉ. मिनी बोधनवाला, सीईओ, वाडिया रुग्णालय


वाडिया रुग्णालयाने केला शस्त्रक्रियेचा खर्च

'फॅक्टर 7'च्या एक मिलीग्रॅम व्हायलची किंमत ४८ हजार एवढी आहे. आणि दीपिकाला १९ व्हायल लागणार होत्या. त्याचा खर्च ९ लाख रुपये येणार होता. पण, हा खर्च वाडिया रुग्णालयातर्फे करण्यात आला आहे.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा