Advertisement

विरार-डहाणू चौपदरीकरण प्रकल्पाचे 86% काम पूर्ण

या प्रकल्पातील रेल्वे रुळांना क्रॉस करणारे अनेक पूल आणि रोड अंडर ब्रिज पूर्ण झाले असून स्थानकातील पायाभूत सुविधा देखील विकसित केल्या जात आहेत.

विरार-डहाणू चौपदरीकरण प्रकल्पाचे 86% काम पूर्ण
SHARES

विरार-डहाणू रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पाने महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत. या प्रकल्पात 86% मातीकाम आणि 41% ट्रॅक टाकण्याचे काम आता पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प जून 2027 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

या कॉरिडॉरमध्ये मोठ्या प्रमाणात सिव्हिल इंजिनिअरिंगचे प्रयो केले जात आहेत. आतापर्यंत 2.18 लाख घनमीटरचे कटिंग आणि 23.5लाख घनमीटरपेक्षा जास्त माती भरण्याचे काम करण्यात आले आहे.

या प्रकल्पातील रेल्वे रुळांना क्रॉस करणारे अनेक पूल आणि रोड अंडर ब्रिज (RUB) पूर्ण झाले आहेत. यासह, स्टेशन पायाभूत सुविधा देखील विकसित केल्या जात आहेत.

विरार (virar) आणि वैतरणा येथे स्टेशन डेकचे बांधकाम सुरू आहे. या कॉरिडॉरमुळे उपनगरीय सेवांची क्षमता आणि वारंवारता वाढणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वे नेटवर्कवरील ताण कमी होईल आणि हजारो प्रवाशांचा दैनंदिन प्रवास सुधारेल.

पालघर, सफाळे, केळवे रोड, बोईसर, वाणगाव, उमरोली आणि डहाणू रोड (dahanu road) येथे नवीन इमारती, फूट ओव्हर ब्रिज, कनेक्टिंग ओव्हरपास, स्टाफ क्वार्टर, रिले हट आणि नियंत्रण सुविधा अंतिम टप्प्यात आहेत.

उमरोली, बोईसर आणि वाणगाव येथील या प्रकल्पाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. सध्या तिथे केबल टाकण्यासह सिग्नलिंग आणि टेलिकॉमचे काम सुरू आहे.

सध्या, विरार आणि डहाणू रोड दरम्यानच्या मार्गावर फक्त नऊ स्थानके आहेत. यापैकी दररोज 5.8 लाखांहून अधिक लोक डहाणूला येण्यासाठी विरार स्थानकाचा वापर करतात.

तसेच डहाणू रोड स्थानकातून 2.6 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. सोबत वैतरणा आणि बोईसर सारख्या लहान स्थानकांवरही दररोज मोठ्या संख्येसह प्रवासी प्रवास करतात.

या मार्गासाठी सात नवीन स्थानके तयार करण्यात येणार आहेत. यात बीएसईएस कॉलनी, वाधीव, सरतोडी, माकुणसार, चिंतुपाडा, पांचाली आणि वांजरवाडा ही स्थानके आहेत.

ही स्थानके सध्याच्या चौपदरीकरण प्रकल्पाचा (Virar-Dahanu Quadrupling project) भाग नाहीत परंतु ते योजनांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.

या प्रकल्पासाठी 3578 कोटी रुपये खर्च येणार आहे. तसेच मुंबई (mumbai) अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP) फेज थ्री अंतर्गत त्याचे काम चालू आहे.



हेही वाचा

ठाण्यात 30 सप्टेंबरपर्यंत पाणीपुरवठा खंडित

मुंबई: पालिकेेला शिक्षकांचे जात प्रमाणपत्र तपासण्याचे आदेश

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा