Advertisement

मुंबईत 'इतक्या' रुग्णांनी केली कोरोनावर मात

मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. मात्र, या परिस्थितीत एक दिलासादायक बातमी आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण होण्याचं प्रमाणही अधिक असल्याचं दिसून येत आहे.

मुंबईत 'इतक्या' रुग्णांनी केली कोरोनावर मात
SHARES

मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. मात्र, या परिस्थितीत एक दिलासादायक बातमी आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण होण्याचं प्रमाणही अधिक असल्याचं दिसून येत आहे.  मुंबईत लाख ३ हजार ३६८ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ७३ हजार ५५५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या २३ हजार ७०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत


महापालिकेच्या आकडेवारीनुसार, जूनच्या तुलनेत जुलैमध्ये बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. जूनच्या पहिल्या १८ दिवसात रोज सरासरी ८३७ रुग्ण बरे होत होते. जुलैच्या पहिल्या १८ दिवसात रोज १ हजार ४६२ रुग्ण बरे झाले आहेत.  १ जुलैपासून ते १८ जुलैपर्यंत २६ हजार ३२२ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे.  तर १ ते १८ जून दरम्यान १५ हजार ५९ रुग्ण बरे झाले आहेत.  २ जुलै रोजी अवघ्या एका दिवसात सर्वाधिक ५ हजार ९०३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जून महिन्यात १५ जूनला सर्वाधिक ३ हजार १३९ रुग्णांना घरी सोडण्यात आलं होतं.

मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७० टक्के झालं आहे. तर मुंबईतील कोरोनाचा डबलिंग रेट ५५ दिवसांवर गेला आहे. रोजचं रुग्णवाढीचं प्रमाण१.२६ टक्के आहे. मुंबईतील करोनाची परिस्थिती नियंत्रणात असून दिवसाला रोज १२०० ते १३०० रुग्ण सापडत आहेत. मात्र, तितक्याच प्रमाणात कोरोना रुग्ण बरे होऊन घरीही जात आहेत.



हेही वाचा - 

मुंबई कोरोनाचे ९९५ नवे रुग्ण, दिवसभरात ६५ जणांचा मृत्यू

मुंबई महापालिकेला दुसरा धक्का, आरोग्य समितीच्या अध्यक्षांनाच कोरोनाची लागण




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा