Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ७८ नवे रूग्ण

पनवेल महापालिका हद्दीत शनिवारी (३१ ऑक्टोबर) ७८ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून १०८ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ७८ नवे रूग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत शनिवारी  (३१ ऑक्टोबर) ७८ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून १०८ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर २ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये कळंबोली आणि खारघर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील १२, नवीन पनवेल ९, खांदा काॅलनी ५, कळंबोली ५, कामोठे १९, खारघर येथील २६ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल १२, नवीन पनवेल २१, कळंबोली १०, कामोठे ३२, खारघर ३० तळोजा येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २३५३३ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २२२८५ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५५२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ६९६ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.



हेही वाचा -

मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर आतापर्यंत साडेतीन कोटींचा दंड वसूल

प्रवाशांच्या गर्दीचं नियोजन करण्यात रेल्वे प्रशासनाची गाडी अद्याप धीम्या मार्गावर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा