Advertisement

८८ वर्षांच्या वृद्धानं वैद्यकिय संशोधनासाठी केलं स्किन दान

लोपेज आणि त्यांच्या कुटुंबातील ८० सदस्यांनी अवयव दानाचं वचन दिलं होतं.

८८ वर्षांच्या वृद्धानं वैद्यकिय संशोधनासाठी केलं स्किन दान
SHARES

विरारच्या आगाशी इथल्या शर्ली वाडीतील ८८ वर्षीय रहिवासी बावटीस लोप्स यांनी त्यांच्या मृत्यूनंतरही एक अनुकरणीय छाप सोडली आहे.

शनिवारी, वयाशी संबंधित आजारांमुळे लोप्स यांचं निधन झालं. त्यांच्या दोन मुलांनी ऐरोली इथल्या नॅशनल बर्न सेंटरला वडिलांची स्किन दान करण्यासाठी बोलावलं.

२०१६ मध्ये, लोपेज यांनी आपले अवयव फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, वसईला वैद्यकीय संशोधनासाठी दान करण्याचं वचन दिलं होतं. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन, त्याच्या कुटुंबातील ८० सदस्यांनी आणि नातेवाईकांनी त्यांचं अवयव दान करण्याचं वचन दिलं होतं.

“लोपेजनं त्यांचे आणि त्याच्या कुटुंबाचं अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. काही सदस्य परदेशात आहेत. सर्वांनी २०१६ मध्ये अवयव दानाची प्रतिज्ञा ऑनलाईन केली. लोप्सचा एक मुलगा इलियास (वय ६५)चं २०१८ मध्ये कर्करोगानं निधन झालं. कर्करोगाच्या रुग्णांचं अवयव दान केलं जाऊ शकत नाहीत म्हणून आम्हाला फक्त त्याचे डोळे मिळू शकले, ” असं संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम पवार म्हणाले.

नैसर्गिक कारणांमुळे मरण पावलेले लोक त्यांचे डोळे, हृदय, फुफ्फुसे, यकृत, मूत्रपिंड, आतडे, स्वादुपिंड आणि त्वचा दान करू शकतात.

“लोप्सच्या बाबतीत, आम्ही केवळ कोरोनामुळे त्याची त्वचा घेऊ शकलो. त्याचं वय ८० वर्षांपेक्षा जास्त असल्यानं आम्ही त्याचे डोळे घेऊ शकलो नाही. अगदी हाडे आणि अस्थिमज्जा देखील निरोगी लोक दान करू शकतात, ” असंपवार म्हणाले.

पवार म्हणाले, "आमची संस्था वसई-विरार, पालघर आणि राज्यातील इतर भागांतील गावांपर्यंत पोहोचत आहे जेणेकरून लोक पुढे येतील आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये संशोधनासाठी त्यांचे अवयव, उती आणि शरीराचे इतर अवयव दान करण्याची प्रतिज्ञा करतील."



हेही वाचा

मुंबईत डेल्टा प्लसचे १२८ रुग्ण

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी महापालिकेची तयारी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा