Advertisement

मुंबईत मागील २ दिवसांत ९५० नवे रुग्ण

मंगळवारपर्यंत उपचाराधीन रुग्णांची संख्या ८९४६ झाली आहे. मुंबईत सोमवारी ४०९ नवीन रुग्ण आढळले, तर मंगळवारी ५४१ नवीन रुग्ण आढळले.

मुंबईत मागील २ दिवसांत ९५० नवे रुग्ण
SHARES

मुंबईतील कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव कमी झाला असून रुग्णांच्या (patients) दुपटीच्या कालावधीतही वाढ झाली आहे. मागील २ दिवसांत मुंबईत ९५० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसंच, २ दिवसांत २६ रुग्णांचा मृत्यू झाला, तर २ दिवसांत अडीच हजारांहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले. मंगळवारपर्यंत उपचाराधीन रुग्णांची संख्या ८९४६ झाली आहे. मुंबईत सोमवारी ४०९ नवीन रुग्ण आढळले, तर मंगळवारी ५४१ नवीन रुग्ण आढळले.

आतापर्यंत ९१ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. २ दिवसांत मोठ्या संख्येनं रुग्णांची दुबार नावं व मुंबईबाहेरील रुग्णांची नावं वगळण्यात आल्यामुळं उपचाराधीन रुग्णांची संख्या प्रचंड घटली आहे. दिवाळीच्या काळात मुंबईतील चाचण्यांची संख्याही कमी झाली होती. तसंच, रुग्णसंख्याही कमी झाली आहे. आतापर्यंत १६ लाख ९५ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील रुग्णवाढीचा वेग कमी झाला असून, दररोज ०.२३ टक्के रुग्ण आढळून येत आहेत. तसंच, रुग्णदुपटीचा कालावधी २९७ दिवसांवर गेला आहे. मुंबईत अजूनही ५२२७ इमारती सील करण्यात आलेल्या आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा