Advertisement

राज्यात कोरोनाचे ९८४४ नवे रुग्ण

राज्यातील मृत्यूदर आता २ टक्के इतका आहे. तर आतापर्यंत एकूण ५७ लाख ६२ हजार ६६१ रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यात कोरोनाचे ९८४४ नवे रुग्ण
SHARES

महाराष्ट्रात (maharashtra) गुरूवारी कोरोनाचे (coronavirus) नवीन ९८४४ रुग्ण आढळले आहेत.  नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या किंचित कमी आहे. दिवसभरात ९३७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.तर १९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

राज्यातील मृत्यूदर आता २ टक्के इतका आहे. तर आतापर्यंत एकूण ५७ लाख ६२ हजार ६६१ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९३ टक्क्यांवर पोहोचले आहे.

मुंबईत गुरूवारी ७८९ नवे रुग्ण सापडले आहेत. तर ५४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईतील रुग्णांचा एकूण आकडा ७ लाख २४ हजार ११३ झाला आहे. तर आतापर्यंत ६ लाख ९१ हजार ६७० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत दिवसभरात १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मुंबईत १५ हजार ३४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या १४८१० सक्रीय रुग्ण आहेत.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख २१ हजार ७६७ इतकी झाली आहे. पुण्यात सक्रीय रुग्ण १७ हजार ३६३ इतके आहेत. ठाणे जिल्ह्यात सध्या १२ हजार ९९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या ९ हजार ७०४ इतकी आहे. नागपूर जिल्ह्यात ही संख्या ३ हजार ८६२ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ९९९ इतकी आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील

मुंबई मनपा   ७७३

ठाणे   ७०

ठाणे मनपा   १३२

नवी मुंबई मनपा     १३९

कल्याण डोंबवली मनपा     ७६

उल्हासनगर मनपा   २

भिवंडी निजामपूर मनपा     ५

मीरा भाईंदर मनपा   ५३

पालघर १५९

वसईविरार मनपा    १४८

रायगड ६०९

पनवेल मनपा १४६

ठाणे मंडळ एकूण    २३१२

 नाशिक १९०

नाशिक मनपा ७०

मालेगाव मनपा      ०

अहमदनगर   ४४०

अहमदनगर मनपा   ९

धुळे   ६

धुळे मनपा   ५

जळगाव      २०

जळगाव मनपा ४

नंदूरबार      ४

नाशिक मंडळ एकूण  ७४८

पुणे   ७४१

पुणे मनपा    ३५१

पिंपरी चिंचवड मनपा २३०

सोलापूर      २९६

सोलापूर मनपा १०

सातारा ८३७

पुणे मंडळ एकूण     २४६५

कोल्हापूर     १३६२

कोल्हापूर मनपा     ३६१

सांगली ६६९

सांगली मिरज कुपवाड मनपा २१२

सिंधुदुर्ग      ३९२

रत्नागिरी     ५२०

कोल्हापूर मंडळ एकूण ३५१६

 औरंगाबाद    ११५

औरंगाबाद मनपा     ४०

जालना ४३

हिंगोली ६

परभणी १२

परभणी मनपा १६

औरंगाबाद मंडळ एकूण      २३२

 लातूर  ३१

लातूर मनपा  ४

उस्मानाबाद   ९१

बीड   १५६

नांदेड  ७

नांदेड मनपा  १३

लातूर मंडळ एकूण   ३०२

 अकोला १७

अकोला मनपा १२

अमरावती     ४०

अमरावती मनपा     ११

यवतमाळ     २४

बुलढाणा      ५८

वाशिम ६

अकोला मंडळ एकूण  १६८

नागपूर २३

नागपूर मनपा २७

वर्धा   ११

भंडारा  ९

गोंदिया ४

चंद्रपूर ६

चंद्रपूर मनपा  ७

गडचिरोली    १४

नागपूर एकूण १०१



हेही वाचा -

सलग दुसऱ्या दिवशी राज्यात लसीकरणाचा विक्रमी उच्चांक

डेक्कन एक्स्प्रेस 'विस्टाडोम'सह २६ जूनपासून पुन्हा धावणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा