पालिका शाळांत लागणार सॅनेटरी व्हेंडिंग मशिन

  Pali Hill
  पालिका शाळांत लागणार सॅनेटरी व्हेंडिंग मशिन
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबई महानगर पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता पालिकेनं शाळांमध्ये सॅनेटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन बसवण्याचा निर्णय घेतलाय. पालिकेच्या 172 शाळांमध्ये सॅनेटरी व्हेंडिंग मशिन बसवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा हेमांगी वरळीकर यांनी दिलीय. यासाठी 1 कोटी 53 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या मशिनद्वारे १६ लाख 10 हजार 200 नॅपकिनचा पुरवठा होऊ शकेल. दरम्यान सॅनेटरी नॅपकिनची विल्हेवाट न लावता तसेच फेकून दिल्यानं आरोग्य धोक्यात येत असल्याची माहिती एका सर्वेक्षणातून समोर आलीये. त्यामुळे या व्हेंडिंग मशिनमध्ये नॅपकिनची विल्हेवाट लावण्याची सोयही असेल, असं वरळीकर यांनी सांगितलं. यासंबंधीचा प्रस्ताव नुकताच स्थायी समितीत मंजूर झाला असून लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.