Advertisement

वेळेआधी बाळाला जन्म देणाऱ्या मातांना समुपदेशनाची गरज


वेळेआधी बाळाला जन्म देणाऱ्या मातांना समुपदेशनाची गरज
SHARES

वेळेआधी म्हणजेच 9 महिने पूर्ण न होता ज्या महिलांची प्रसुती होते, त्यांना अनेकदा बाळाची काळजी कशी घ्यावी, याबाबत तितकीशी माहिती नसते. पण, ज्या मातांचं अशा परिस्थितीत समुपदेशन झालं आहे, अशा मातांना या गोष्टीमुळे फायदा झाल्याचं अॅबॉटच्या ‘क्वॉलिटी ऑफ सर्व्हायव्हल’ या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

अॅबॉटने क्वॉलिटी ऑफ सर्व्हायव्हलच्या अंतर्गत एक सर्वे केला. या सर्वेत वेळेआधी जन्मलेल्या बाळांच्या मातांसाठी पोषणावर भर आणि समुपदेशनाची गरज या विषयावर काम केलं गेलं. नवजात बालकांच्या मातांना वेळेआधी जन्मलेल्या बाळाच्या वाढीच्या टप्प्यांना समजून घेण्यासाठी त्यांच्या शारीरिक आणि सर्वांगीण वाढीचे टप्पे आणि पोषण याबाबत मार्गदर्शन केल्यामुळे बराच फायदा झाल्याचं या सर्वेतून स्पष्ट झालं आहे.


येथे 1 हजारपेक्षा जास्त मातांचं सर्वेक्षण

मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई येथील 1 हजारपेक्षा जास्त मातांचं सर्वेक्षण केलं गेलं. त्यावेळी त्या मातांची काळजी, चिंता आणि मुलांबाबतच्या अपेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न केला गेला. या सर्वेक्षणातून बाळाच्या जन्मावेळी पोषण आणि वाढीच्या टप्प्यासंदर्भात समुपदेशन न मिळालेल्या मातांच्या तुलनेत समुपदेशन मिळालेल्या माता चार पट अधिक तयार असतात हे स्पष्ट झालं आहे.


भारतात वेळेपूर्वी जन्माला येणाऱ्या बालकांचे प्रमाण वाढू लागले आहे. पण, अशा मुलांना वाढवणं हे मातांसाठी अत्यंत आव्हानाचे ठरत आहे. जाणीवजागृती आणि वेळेत समुपदेशन या दोन गोष्टी मातांसाठी मदत आणि सल्ल्याची गरज असते. एनआयसीयूमधील डॉक्टरांनी वेळेपूर्वी जन्मलेल्या बाळांमध्ये स्तनपान, काळजी आणि विकास या सर्वांचं योग्य ज्ञान देणं गरजेचं आहे.
- डॉ. भूपेंद्र अवस्थी, बालरोगतज्ज्ञ, संस्थापक आणि संचालक, सूर्या मदर चाइल्डकेअर


सर्वेक्षणातील काही महत्त्वाचे मुद्दे

एनआयसीयू केंद्र - निओनॅटल इंटेन्सिव्ह केअर युनिट हा मातांसाठी माहिती मिळवण्याचा सुरुवातीचा टप्पा आहे. ज्या मातांना एनआयसीयूमध्ये पुरेसे आणि संबंधित समुपदेशन मिळाले त्या वेळेपूर्वी जन्मलेल्या बाळाला वाढवण्यासाठी चारपट अधिक सुसज्ज होत्या.


माहितीची कमतरता  

या सर्वेक्षणात फक्त 10 टक्के महिलांना आपल्या वेळेपूर्वी जन्मलेल्या मुलाच्या व्यवस्थापनाबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसते. तर, जवळपास 40 टक्के महिलांना वेळेपूर्वी जन्म आणि त्यांच्या वेळेपूर्वी जन्मलेल्या बाळाच्या पोषणाची, आरोग्याची आणि मानसिक विकासाची काळजी आणि स्वत:ची काळजी यांच्याबाबत थोडीशी माहिती मिळते. वेळेत न जन्मलेल्या बाळांचे शारीरिक आणि मानसिक आव्हान सर्वेक्षण करण्यात आलेल्या महिलांपैकी 93 टक्के महिलांना वाढीच्या प्रत्यक्ष टप्प्यांबाबत आव्हाने येतात. वजनवाढ, मेंदूचा विकास, हालचाल अशा सर्व प्रकारची आव्हाने या मुलांना येतात. या मुलांची प्रतिकारशक्ती दोन वर्ष कमी असते.


कमी प्रतिकारशक्ती आणि आजारातून बरे होण्यासाठी घेतलेला जास्त वेळ ही पहिल्या दोन वर्षांमधील वेळेआधी जन्मलेल्या मुलांसमोरची आव्हाने असतात. मुलांच्या जन्माच्या पहिल्या 12 महिन्यांमध्ये ताप, सर्दी, कमी भूक आणि श्वसनाच्या समस्या हे काही प्रमुख आव्हानं असतात.


वेळेपूर्वी जन्मलेल्या बाळांना वाढवणे हे वेळेत जन्मलेल्या बाळांच्या तुलनेत वेगळे असते त्यांचा प्रवास वेगळा असतो. आयुष्याच्या पहिल्या वर्षात बाळाचा मेंदू विकसित होतो आणि आयुष्यातील इतर कोणत्याही वेळेच्या तुलनेत ते न्यूरल संपर्क अत्यंत वेगाने जोडतात. त्यामुळे डिएचए आणि नैसर्गिक ई जीवनसत्त्व यांचा आईच्या आहारात समावेश असावा.
- डॉ.उमेश वैद्य, प्रादेशिक वैद्यकीय संचालक, निओनॅटोलॉजी ऑफ क्लाऊडनाइन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा