Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,69,292
Recovered:
46,54,731
Deaths:
78,857
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,649
1,946
Maharashtra
5,33,294
42,582

नेहरु सायन्स सेंटरमध्येही कोरोना आरोग्य केंद्र

मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर वरळीतील नेहरु विज्ञान केंद्रात कोव्हिड आरोग्य केंद्राचे लोकार्पण करण्यात आले.

नेहरु सायन्स सेंटरमध्येही कोरोना आरोग्य केंद्र
SHARES

मुंबईतील वाढत्या कोरोना (coronavirus) रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर वरळीतील नेहरु विज्ञान केंद्रात कोव्हिड आरोग्य केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. नेहरु सायन्स सेंटरमध्ये १५० रुग्णशय्या क्षमतेच्या समर्पित कोरोना आरोग्य केंद्रासह पोद्दार आयुर्वेदिक महाविज्ञालयात २२५ बेड्सची क्षमता असलेले कोव्हिड काळजी केंद्र आहे. पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांच्या हस्ते काल ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले.

वरळीतील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया (NSCI) येथील विद्यमान समर्पित कोरोना आरोग्य केंद्रातील रुग्णशय्यांची क्षमता देखील ५०० वरुन वाढवून आता ८०० इतकी करण्यात येत आहे. ही कार्यवाही येत्या आठवड्यात पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यामुळे नेहरु विज्ञान केंद्र, पोद्दार महाविद्यालय आणि एनएससीआय मिळून एकूण ११७५ बेड्स उपलब्ध होतील. कोव्हिड बाधितांवरील उपचारांसाठी यामुळे मोठी सोय होणार आहे. विशेष म्हणजे या सर्व रुग्णशय्यांमधील एकूण ७० टक्के रुग्णशय्या ऑक्सिजन पुरवठ्याच्या सुविधांसह उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर, बेस्ट समितीचे अध्यक्ष आशीष चेंबूरकर, जी/दक्षिण प्रभाग समितीचे अध्यक्ष दत्ता नरवणकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल, नगरसेविका हेमांगी वरळीकर, नगरसेवक संतोष खरात, उपआयुक्त (परिमंडळ 2) विजय बालमवार, जी/दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा