Advertisement

योग्यवेळी दिला सीपीआर, वाचला महिलेचा जीव


योग्यवेळी दिला सीपीआर, वाचला महिलेचा जीव
SHARES

विनीता बिपीन ही महिला नेहमीप्रमाणं कामावर निघाली, पण अचानक पाठीत अाणि छातीत दुखू लागल्यानं त्यांनी अापल्या फॅमिली डाॅक्टरशी चर्चा करून थेट हाॅस्पीटल गाठलं. ईसीजीमध्ये त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका अाल्याचं निदान झालं. फॅमिली डाॅक्टरनी त्यांनी फोर्टिस हाॅस्पीटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. पण हाॅस्पीटलमध्ये दाखल होण्यापूर्वीच त्यांनी प्रतिसाद देणं थांबवलं. फोर्टिसमध्ये पोहोचल्यानंतर डाॅक्टरांच्या टीमने त्यांच्यावर सीपीअार (कार्डियोपल्‍मनरी रेसुस्किटेशन) सुरू केलं. टप्प्याटप्प्यानं सीपीअारसह त्यांना शाॅक ट्रिटमेंटही देण्यात अाली. तब्बल ६० मिनिटांच्या प्रयत्नानंतर विनिता यांचा जीव वाचवण्यात डाॅक्टरांना यश अालं. त्यानंतर त्यांच्यावर प्रायमरी एंजियोप्लास्टीही करण्यात अाली.


हे करा!

भारतात दरवर्षी १० लाखांहून अधिक हृदयविकाराशी संबंधित केसेस अाढळून येतात. ६० वर्षे अाणि त्यावरील वयोगटातील व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका अाला अाणि हाॅस्पीटल जवळच असले तर त्याला २० मिनिटापर्यंत सीपीअार द्यावे. अशा परिस्थितीत रुग्णाला सीपीअार देऊन जीव वाचण्याचं प्रमाण फक्त ५ टक्के अाहे.


छातीत आणि पाठीत होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष कधीकधी धोक्याचं होऊ शकतं. या वेदनांबाबत सखोलपणे जाणून घेण्‍यासाठी वेळेवर निदान करणं अत्‍यंत महत्‍त्‍वाचं आहे. या केसमध्‍ये ६० मिनिटांपेक्षा अधिक काळ सीपीआर देण्‍यात आला आणि तेच त्यांच्या जीवासाठी लाभदायी ठरलं.
- डॉ. संदीप गोरे, आपत्‍कालीन विभागाचे प्रमुख, फोर्टिस हॉस्पीटल


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा