Advertisement

सावधान! ब्रिटननंतर मुंबईत आढळला नवा कोरोना

दक्षिण अफ्रिकेत मिळालेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराशी संबंधित आहे.

सावधान! ब्रिटननंतर मुंबईत आढळला नवा कोरोना
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह देशभरात पुढच्या काही दिवसांत लस देण्यात येणार आहे. शिवाय, कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यास महापालिका अनेक प्रयत्न करत आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मुंबईत नवा कोरोना आढळला आहे. मुंबई उपनगरातील खारघरमध्ये टाटा मेमोरियल सेंटरमध्ये कोरोनाचा नवा म्युटेंट आढळून आला आहे.

या म्युटेशनला E484K च्या नावानंही ओळखलं जात. मिळालेल्या माहितीनुसार, हा दक्षिण अफ्रिकेत मिळालेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराशी संबंधित आहे. याबाबत एका वृत्तपत्रात माहिती देण्यात आली आहे. हे दक्षिण अफ्रिकेत आढळून आलेल्या ३ म्यूटेशन (K417N, E484K आणि N501Y) मधून आला आहे.

'त्यांच्या टीमनं ७०० कोविड-१९ नमुन्यांच्या जिनोमच्या सिक्वेंसिंगच्या माध्यमातून पडताळणी केली होती. यांपैकी ३ नमुन्यांमध्ये E484K म्यूटेंट मिळाला आहे. कोविडचा हा म्यूटेंट मिळणं यासाठी चिंताजनक आहे. जुन्या विषाणूमुळे शरिरात प्रतिरोधक क्षमतेमुळं तयार झालेली ३ अँटिबॉडी यावर प्रभावहीन आहे', असं टाटा मेमोरियल सेंटरचे होमियोपॅथी विभागाचे प्रा. डॉक्टर निखिल पटकर यांनी म्हटलं.

माध्यमातील वृत्तांनुसार, दक्षिण अफ्रिकेत आढळून आलेल्या म्युटेंटला ब्रिटनमधील विषाणूपेक्षा अधिक धोकादायक सांगण्यात येत आहे. लस अँटिबॉडी बनवण्याच्या सिद्धांतावर काम करते. दरम्यान, संशोधक हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की, कोरोनाच्या या म्युटेंटचा जगभरात सुरु झालेल्या लसीकरणावर काय परिणाम होणार आहे.

ज्या ३ रुग्णांमध्ये कोरोनाचा हा म्युटेंट आढळून आला होता. ते गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये करोना संक्रमित झाले होते. तिघांचं वय ३०, ३२ आणि ४३ वर्षे आहे. यांपैकी दोन रुग्ण रायगड आणि एक ठाण्यातील आहे. यांपैकी दोघांमध्ये कोरोनाची साधारण लक्षणं दिसून आली होती. त्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. तर एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

काही दिवसांपूर्वी ब्रिटनमधून आलेल्या नव्या कोरोनाच्या विषाणूनं काळजीत भर टाकली असून, भारतात या नव्या विषाणूच्या संक्रमितांची संख्या १०० वर पोहोचणार आहे.  मुंबईतील ३ रुग्णांमध्ये अशा प्रकारचा विषाणू आढळून आला आहे, ज्यावर अँटिबॉडीजचाही परिणाम होत नाही.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा