Advertisement

माझगावमधील हवा दिल्लीपेक्षाही वाईट!

संपूर्ण देशात दिल्लीमधील हवा खूपच खराब अाहे. दिल्लीतील वायू प्रदुषणाबद्दल मोठी चिंता व्यक्त होत असते. पण अाता मुंबईचीही त्याच दिशेने वाटचाल सुरू असल्याचं दिसत अाहे.

माझगावमधील हवा दिल्लीपेक्षाही वाईट!
SHARES

राजधानी दिल्लीपाठोपाठ अाता मुंबईतील हवाही प्रदुषित झाल्याचं दिसून येत अाहे. माझगावमधील हवा मोठ्या प्रमाणावर दुषित असल्याचं समोर अालं अाहे. मंगळवारी माझगामध्ये हवा प्रदूषण निर्देशांक ४१५ होता. तर दिल्लीमध्ये हा निर्देशांक ३५८ होता. 


हवेची गुणवत्ता खालावली

संपूर्ण देशात दिल्लीमधील हवा खूपच खराब अाहे. दिल्लीतील वायू प्रदुषणाबद्दल मोठी चिंता व्यक्त होत असते. पण अाता मुंबईचीही त्याच दिशेने वाटचाल सुरू असल्याचं दिसत अाहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली अाहे. 'सफर' (सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टींग अॅण्ड रिसर्च) या संस्थेच्यावतीने मंगळवारी सायंकाळी मुंबईतील हवेची तपासणी करण्यात आली होती. यावेळी हवा प्रदूषण निर्देशांक ४१५ दिसून अाला. 


निर्देशांक अतिवाईट 

तपासणीत मुंबईतील हवेची गुणवत्ता वाईट आणि अतिवाईट या दोन श्रेणीत नोंदवली अाहे. मागील काही दिवसांपूर्वीही माझगावमध्ये हवेची तपासणी करण्यात अाली. सोमवारी वायू प्रदूषण निर्देशांक ३५२ होता. हा निर्देशांक अतिवाईट समजला जातो. याशिवाय ६ नोव्हेंबर रोजी ३२७, १० नोव्हेंबर रोजी ३२९ आणि १३ नोव्हेंबर रोजी ३१५ निर्देशांक नोंदवण्यात आला.


फिरणे अपायकारक 

हवा प्रदूषण निर्देशांक ४०१ पेक्षा अधिक असणं हानीकारक समजलं जातं. अशा हवेत फिरणे, काम करणे अपायकारक असते. त्यामुळे  हृदय विकार, फुफ्फुसाचे विकार असणारे रुग्ण, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक यांनी बाहेर जाण्याएेवजी घरात थांबावं असं 'सफर'ने म्हटले आहे. माझगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असल्याने धूळ हवेत मिसळली जात अाहे. तसंच थंडीमुळे वातावरण बदललेलं असून धूकं अाहे. त्यामुळे माझगावमध्ये हवा प्रदूषण वाढले असल्याचं  'सफर'चे प्रकल्प संचालक गुरफान बेग यांनी सांगितलं. 



हेही वाचा - 

केईएम हॉस्पिटल देशात अव्वल



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा