Advertisement

मुंबईतील सर्व कोविड काळजी केंद्रे पुन्हा होणार सुरू

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्यानं महापालिका व राज्य सरकार सज्ज झालं आहे.

मुंबईतील सर्व कोविड काळजी केंद्रे पुन्हा होणार सुरू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्यानं महापालिका व राज्य सरकार सज्ज झालं आहे. महापालिकेनं सर्व कोविड काळजी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एका आठवड्याच्या कालावधीत ही केंद्रे सुरू करण्याचे निर्देश मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सर्व सहायक आयुक्तांना दिले आहेत.

पालिकेच्या आकडेवारीनुसार, कोरोना काळजी केंद्रांत ७० हजार ५१८ खाटा उपलब्ध आहेत. यांपैकी सध्या १३ हजार १३६ खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. तसंच, ९७५७ खाटा राखीव आहेत. नोव्हेंबर महिन्यानंतर रुग्णसंख्या कमी झाल्यामुळं बहुतांश कोविड काळजी केंद्रे बंद करण्यात आली होती. ७ जम्बो कोविड केंद्रे आणि प्रत्येक विभागात १ असे एकूण २४ कोविड केंद्रे ३१ मार्च २०२१ पर्यंत सुरू ठेवण्यात येणार होती.

मागील २ आठवड्यांच्या कालावधीत कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्यानं रुग्णालयातील ३० टक्के खाटांवर सध्या रुग्ण दाखल आहेत. त्यामुळं बंद कोविड केंद्रे सुरू करण्याबरोबरच जम्बो केंद्र अनिश्चित कालावधीपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या वैद्यकीय चाचणीचे अहवाल २४ तासांच्या आत महापालिकेला कळविणे, तसेच याबाबतची माहिती संबंधित संकेतस्थळावर तत्काळ अपलोड करणं बंधनकारक आहे.

सर्व २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या विभागात आवश्यक ते सर्व नियोजन तातडीने करावं. आयसीयू खाटा, ऑक्सिजन खाटा, रुग्णवाहिका, मनुष्यबळ, औषधोपचार, आदी सर्व संबंधित बाबींचं सूक्ष्मस्तरीय नियोजन करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा