Advertisement

रुग्णवाहिका चालकाच्या तत्परतेमुळे वाचला बाइकस्वाराचा जीव


रुग्णवाहिका चालकाच्या तत्परतेमुळे वाचला बाइकस्वाराचा जीव
SHARES

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि त्यात जाणारे बळी ही मुंबईकरांसाठी मोठी गोष्ट नाही. असाच एक प्रकार वाशी टोलनाक्याजवळ घडला. पण, रुग्णवाहिकेच्या चालकानं दाखविलेल्या तत्परतेमुळे एका 22 वर्षीय तरूणाचे प्राण वाचवण्यात यश आलं आहे.

राजकोट येथे राहणारा तेजस पटेल ( नाव बदलले आहे ) हा तरूण कुलाबा येथे आपल्या काकांकडे पुढच्या शिक्षणासाठी आला होता. कॉलेज चालू असताना काही दुसरा अभ्यासक्रम करता येईल का? याची चाचपणी करण्यासाठी नवी मुंबईतील वेगवेगळ्या काॅलेजमध्ये चौकशी करण्यासाठी गेला असता सायन-पनवेल महामार्ग येथील वाशी टोलनाक्याजवळ  खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे त्याची मोटारसायकल घसरली आणि मागून येणाऱ्या ट्रकने त्याला धडक दिली.

या अपघातात त्याला अतिरक्तस्राव झाल्यामुळे तो जागीच बेशुद्ध झाला. अपघात झाल्यावर अर्धा-पाऊण तास झाला तरीसुद्धा त्याला घटनास्थळावरून हलवण्यात आलं नव्हतं. त्याचवेळी चेंबूर येथील एका पेशंटला सोडून शांताराम बामणे हे रुग्णवाहिकाचालक वाशी येथील स्टर्लिंग वोक्हार्ट हॉस्पिटलला जात होते. रस्त्यावर असलेली गर्दी पाहता बामणे यांनी रुग्णवाहिका थांबवली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून बामणे यांनी  तेजसला तात्काळ रुग्णवाहिकेत घेतले आणि वाशीतील स्टर्लिंग वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये भरती केले.

तेजसला लागलेला मार इतका भयंकर होता की त्याची पोटातील युरीन ब्लॅडर म्हणजेच लघवी साठण्याची पिशवी फाटली होती. तेजसला रुग्णालयात दाखल केल्यावर त्याच्यावर पुढील २४ तासांमध्ये तीन शस्रक्रिया कराव्या लागल्या.

रस्त्यावरील होणाऱ्या अपघातात ७० टक्के मृत्यू हे अतिरक्तस्रावामुळे होतात. अपघात झाल्यावर रुग्णाला तात्काळ उपचार मिळाले, तर त्याचे प्राण वाचू शकते. या प्रकरणातदेखील १० मिनिटे विलंब झाला असता तर कदाचित या बाइकस्वाराचा मृत्यू झाला असता.

डॉ. अभिजीत बागुल, ज्येष्ठ ट्रॉमा सर्जन, वोक्हार्ट  हॉस्पिटल



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा