Advertisement

मुंबईत नवं जम्बो कोविड सेंटर - देवेंद्र फडणवीस

भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी परिसरात जम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी राज्य सरकारनं केलेली विनंती केंद्र सरकारनं तत्काळ मान्य केली.

मुंबईत नवं जम्बो कोविड सेंटर - देवेंद्र फडणवीस
SHARES

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी परिसरात जम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी राज्य सरकारनं केलेली विनंती केंद्र सरकारनं तत्काळ मान्य केली आहे. केंद्र सरकारकडून आणखी एक दिलासा मिळाल्याचं राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. बीपीसीएलच्या जागेतील कोविड सेंटरबाबत फडणवीस यांनी सोशल मीडियातून माहिती दिली. 

महाराष्ट्र सरकारची विनंती तत्काळ मान्य करीत मुंबई येथील भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी परिसरात जम्बो कोविड सेंटरसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी परवानगी दिली आहे. याबद्दल त्यांचे आभार मानताच 'या जम्बो कोविड सेंटरला अखंडित ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी बीपीसीएलने तयारी दर्शविली आहे. त्यामुळं हजारो ऑक्सिजन बेडस इथं उपलब्ध होऊन कोरोनाच्या रुग्णांवर उपचार होऊ शकतील', असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं 

बीपीसीएलचे संचालक अरुणसिंग यांच्याशी दूरध्वनीवर झालेल्या चर्चेच्या वेळी त्यांनी राज्य सरकारने कॉम्प्रेसरची व्यवस्था केल्यास ऑक्सिजन सिलिंडर्स भरून देण्याचीही तयारी दर्शविली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा