Advertisement

मुंबई : 6 महिन्याच्या चिमुकलीला HMPV संसर्ग

HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण मुंबईत सापडला आहे.

मुंबई : 6 महिन्याच्या चिमुकलीला HMPV संसर्ग
SHARES

कर्नाटकातील बंगळुरूत आढळलेला व्हायरस गुजरात, नागपूरनंतर आता मुंबईतही आढळला आहे. मुंबईतील पवई येथील हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये ८ जानेवारी सहा महिन्यांच्या बाळामध्ये HMPV झाल्याची नोंद झाली.

मुलाला 1 जानेवारीला गंभीर खोकला, छातीत जडपणा आणि ऑक्सिजनची पातळी 84 टक्क्यांपर्यंत घसरल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मुंबईतील एका सहा महिन्याच्या मुलीला एचएमपीव्हीची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील आठवड्यात तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर आयसीयुत उपचार सुरू आहेत. संबंधित हाॅस्पिटलच्या डाॅक्टरांनी स्थानिक प्रशासनाला रुग्णासंदर्भात माहिती दिली आहे.

तर दुसरीकडे अद्याप स्थानिक प्रशासनाकडून यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. देशभरात दहापेक्षा जास्त रुग्ण गेल्या काही दिवसांत आढळले आहेत. यातील काही रुग्ण बरे झाले असून काही बरे होत आहेत.

सर्वात पहिली केस बंगळुरुत आढळली त्यानंतर गुजरात, नागपूर आणि इतर राज्यात प्रकरणे आढळत गेली असून मुंबईतही एक रुग्ण सापडला आहे. दरम्यान संसर्गाच्या पार्श्वभुमीवर वैद्यकीय आरोग्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी कालच राज्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुट्ट्या रद्द करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) पहिल्यांदा 2001 मध्ये सापडला होता. तथापि, नवीन स्ट्रेनमुळे चीनमध्ये वाढ झाली आहे.

ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) हा एक विषाणू आहे जो सामान्यतः सामान्य सर्दी सारखीच लक्षणे कारणीभूत ठरतो आणि त्यामुळे वरच्या आणि खालच्या श्वसनमार्गाचे संक्रमण होऊ शकते.



हेही वाचा

सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये 2025 मध्ये सुरू होणार यकृत प्रत्यारोपण प्रोग्राम

'आपली चिकीत्सा' योजना पुन्हा सुरू

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा