Advertisement

वांद्रे, चेंबूर, मुलुंड, अंधेरीत सर्वाधिक कोरोना रुग्णवाढ

सुरुवातीला पूर्व उपनगरात कोरोना रुग्णवाढीचा दर जास्त होता. पूर्व उपनगरातील मुलुंड, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला याठिकाणी रुग्णवाढ जास्त होती.

वांद्रे, चेंबूर, मुलुंड, अंधेरीत सर्वाधिक कोरोना रुग्णवाढ
SHARES

मुंबईत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. १ फेब्रुवारीला ३२८ तर १० फेब्रुवारीला ५५८ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर मात्र रोज रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे.  

वांद्रे पश्चिम, चेंबूर, मुलुंड, घाटकोपर, वडाळा, अंधेरी पश्चिम, कुर्ला, ग्रॅन्ट रोड या भागात कोरोना रुग्णवाढ अधिक असल्याचं आढळून आलं आहे.  या भागात आता रोज प्रत्येकी ४० पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. तर अंधेरी पश्चिाम भागात ही संख्या ७० पर्यंत पोहोचली आहे.

सुरुवातीला पूर्व उपनगरात कोरोना रुग्णवाढीचा दर जास्त होता. पूर्व उपनगरातील  मुलुंड, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला याठिकाणी रुग्णवाढ जास्त होती. मात्र त्यानंतर वांद्रे, ग्रँन्ट रोड, अंधेरी, जोगेश्वारी, भांडूप या भागातही रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली. 

मुंबईतील रुग्णवाढीचा दर वाढून आता ०.२२ टक्क्यांवर पोहोचला आहे. वांद्रे पश्चिाम, चेंबूर आणि मुलुंड, कुर्ला, वडाळा, ग्रॅन्ट रोड, अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम मध्ये रुग्णवाढीचा दर जास्त आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा