Advertisement

5.5 किलोच्या सर्वात मोठ्या ट्यूमरची गिनीज बुकमध्ये नोंद


5.5 किलोच्या सर्वात मोठ्या ट्यूमरची गिनीज बुकमध्ये नोंद
SHARES

सायन म्हणजे लोकमान्य टिळक रुग्णालयातील डॉक्टरांनी एका वर्षापूर्वी काढलेल्या ट्यूमरची नोंद एका वर्षानंतर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. हा ट्यूमर 5.5 किलो वजनाचा असल्यामुळे हा जगातील सर्वात मोठा ट्यूमर असल्याचं सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं.

एका वर्षापूर्वी बिहारवरून आलेल्या महिलेच्या पोटातून हा ट्यूमर काढण्यात आला होता. या महिलेचं ऑपरेशन 2016 च्या नोव्हेंबर महिन्यात करण्यात आलं होतं. महिलेला वाटलं आपल्याला दिवस गेल्यामुळे पोट मोठं दिसतंय. त्यामुळे आधी तिने जास्त लक्ष दिलं नाही. पण, नंतर तिची प्रकृती बिघडली. तिच्यावर बिहारमध्येही उपचार सुरू होते. शेवटी, ऑपरेशन शिवाय दुसरा पर्याय डॉक्टरांकडे नव्हता.

मुंबईतील बऱ्याच रुग्णालयांमध्ये तिच्या नातेवाईकांनी चौकशी केली. पण, शेवटी तिचं ऑपरेशन करायचं आव्हान सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी स्वीकारलं आणि ती शस्त्रक्रिया यशस्वी करुन दाखवली.



आम्ही खूप खूष आहोत की आम्ही केलेल्या शस्त्रक्रियेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. शिवाय, महापालिकेच्या रुग्णालयात एवढा मोठा ट्यूमर काढण्याची ही पहिलीच वेळ होती. याचं सर्व श्रेय आमच्या टीमला जातं. 

डॉ. अजित सावंत, युरॉलॉजी विभाग प्रमुख, सायन रुग्णालय


ट्यूमरमुळे या महिलेला भूक लागत नव्हती. त्यामुळे शरीरातील रक्त कमी झालं होतं. तिच्यावर 2 ते 3 आठवडे निरीक्षणाखाली ठेवलं गेलं. पण, शेवटी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानंतर शस्त्रक्रिया करुन ट्यूमर काढण्यात आला.



या ट्यूमरचा आकार आम्हाला माहीत नव्हता. पण, तो जेव्हा काढला, तेव्हा कळलं की त्याचं वजन 5.5 किलो आहे. आम्हाला भीती देखील होती की पेशंट वाचू शकेल की नाही. गिनीज बुकसाठी आम्ही नोंदणी केली होती. पण, त्यानंतर सर्व तपासणी वेगैरे करण्यात 6 ते 7 महिने गेले. त्यानंतर आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. 

डॉ. अजित सावंत, युरॉलॉजी विभाग प्रमुख, सायन रुग्णालय



हेही वाचा

पित्याने ‘सीपीआर’ देऊन वाचवले बाळाचे प्राण


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा