Advertisement

इडियट नव्हे, चतुर... हार्टअटॅक येऊनही बाईकवरून गाठलं हॉस्पिटल


इडियट नव्हे, चतुर... हार्टअटॅक येऊनही बाईकवरून गाठलं हॉस्पिटल
SHARES

आपल्यातील बहुतांश जणांनी 'थ्री इडियट्स' हा हिट सिनेमा पाहिला असेल. या सिनेमात रँचो आपला मित्र राजू याच्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी अॅम्बुलन्सची वाट न बघता थेट स्कूटीवर त्यांना घेऊन हॉस्पिटल गाठतो. सुरूवातीला ओरडा खाल्ल्यानंतर सगळेचजण त्याच्या कल्पकतेचं आणि समयसूचकतेचं कौतुक करतात. अशीच एक घटना माझगाव इथं घडलीय. एका रुग्णानं हार्टअटॅक येऊनही बाईकवरून हॉस्पिटल गाठलं आणि स्वत:चा जीव वाचवला.


गोल्डन अवर महत्त्वाचा

हार्ट अटॅक आल्यानंतर तासाभराच्या आत रुग्णावर उपचार सुरू होणं आवश्यक असतं. ज्याला 'गोल्डन अवर' असं म्हटलं जातं. मुंबईतल्या ट्रॅफिकची कल्पना सर्वांनाच आहे. या ट्रॅफिकमध्ये अॅम्बुलन्स अडकली की रुग्णाला वेळेत हॉस्पिटलमध्ये नेणं कठिण होऊन जातं. त्यामुळे माझगाव भागात राहणाऱ्या ५० वर्षांच्या एका हॉटेल मॅनेजरने हार्ट अटॅक आल्यावर बाईकवरून हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलात आणून जसलोक हॉस्पिटल गाठलेही.


१५ मिनिटांत गाठले हॉस्पिटल

ही घटना १७ ऑगस्टची आहे. या हॉटेल मॅनेजरच्या छातीत कळा यायला सुरू झाल्यानंतर त्याने नजीकच्या हॉस्पिटलमध्ये जात इसीजी काढून घेतला. त्याचे फोटो जसलोक हॉस्पिटलमधील डॉ. शोएब पदारिया यांना तपासण्यासाठी पाठवण्यात आले. डॉ. पदारिया यांनी इसीजी अहवाल तपासल्यावर रुग्णाला त्वरीत हॉस्पिटलमध्ये अॅडमीट होण्याचा सल्ला दिला.

त्यानुसार त्यांनी अॅम्बुलसची वाट बघण्याचा निर्णय घेतला असता, तर कदाचित त्यांच्या जीवावरही बेतू शकलं असतं. पण बाईकवरून अवघ्या १५ मिनिटांत हॉस्पिटल गाठत त्यांनी स्वत: तारलं.


हार्ट अटॅक आल्यावर शक्य तितक्या लवकर उपचार सुरु होणं गरजेचं असतं. यामुळे रुग्णानं घाईनं रुग्णालयात पोहोचाव. या व्यक्तीचा जीव वाचला कारण बाईकचा वापर करुन ते रुग्णालयात पोहोचले. अशा परिस्थीतीत डॉक्टरांनी येऊन उपचार करण्याची वाट न बघता आपणच रुग्णालयात पोहोचावं.
डॉ शोएब पदारिया, हृदयरोगतज्ज्ञ, जसलोक रुग्णालय



हे देखील वाचा - 

कट प्रॅक्टिस कायद्यात डॉक्टरांसाठी कडक नियमावली



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा