रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

 Kings Circle
रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

माटुंगा - लेबर कॅम्प येथील ऋणानुबंध सामाजिक संस्थेतर्फे 1 ऑक्टोबरला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात 125 हून अधिक नागरिकांनी रक्तदान केले. त्याचबरोबर संस्थेच्या वतीने सायंकाळी प्रभागातील जेष्ठ महिलांना साडी वाटप करण्यात आले. यासह लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अपक्ष नगरसेवक विष्णू गायकवाड यांनी हजेरी लावली होती. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी 125 पेक्षा जास्त तरुणांनी रक्तदान शिबिरात भाग घेऊन रक्तदान केले. गायकवाड यांनी तरुणांचे आभार मानत यापुढे रक्तासाठी स्थानिक रहिवाशांची गैरसोय होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. यासब ऋणानुबंध सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे त्यांनी कौतुक केले. दरम्यान कार्यक्रमात चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक तसेच सन्मानचिन्ह गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आले

Loading Comments