Advertisement

खाजगी रुग्णालयांमार्फत लसीकरण शिबिरे आयोजित करा, पालिकेची गृहनिर्माण संस्थांना विनंती

लसीकरण मोहिमेला (vaccination Drive) गती देण्यासाठी मुंबई महानगरपालिके(BMC)नं खासगी रहिवासी वसाहतींना आपल्या आवारात लसीकरण मोहीम राबविण्याचा सल्ला दिला आहे.

खाजगी रुग्णालयांमार्फत लसीकरण शिबिरे आयोजित करा, पालिकेची गृहनिर्माण संस्थांना विनंती
SHARES

लसीकरण मोहिमेला (vaccination Drive) गती देण्यासाठी मुंबई महानगरपालिके(BMC)नं खासगी रहिवासी वसाहतींना आपल्या आवारात लसीकरण मोहीम राबविण्याचा सल्ला दिला आहे.

जी-उत्तरमध्ये (G-North) दादर (Dadar), धारावी (Dharavi) आणि माहीम (Mahim) यासारख्या क्षेत्रांमध्ये उच्चभ्रू सोसायटी आहेत. सोसायटी आवारात लसीकरण मोहीम राबवण्यासाठी हाऊसिंग सोसायटी (Housing society) आवश्यक अर्ज त्यांच्या स्थानिक वॉर्ड कार्यालयात देऊ शकते. त्यानंतर खासगी रुग्णालये सोसायटीच्या सदस्यांसाठी लसीकरण शिबिर घेतील.

काही आठवड्यांपूर्वी पालिकेनं खाजगी कोव्हिड लसीकरण केंद्रे (Private Covid Vaccination Camp) वापरणार्‍या गृहनिर्माण संस्थांना लसी देण्याबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

या विषयावर आवश्यक माहिती मिळविण्यासाठी सोसायटी स्थानिक कोविड वॉर रूम्स(Covid War Room)शी संपर्क साधू शकतात. गेल्या काही वर्षांपूर्वी स्थानिक कोविड वॉर रुग्णांना बेड्सचे वाटप करण्यासाठी आणि इतर आवश्यक माहिती नागरिकांना देण्यासाठी तयार करण्यात आली. जी-उत्तर प्रभागातील बहुतांश गृहनिर्माण संस्थांना यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

या योजनेबद्दल बोलताना प्रभागाचे सहाय्यक नगरपालिका आयुक्त किरण दिघावकर (Kiran Dighavkar) म्हणाले, “सोसायटी सदस्यांनी आमच्याकडे अर्ज केल्यास त्यांना लसीकरण करण्यास कमीतकमी ३ रुग्णालयांनी इच्छा दर्शवली आहे. तथापि, जूनच्या उत्तरार्धात ही शिबिरं आयोजित केली जाऊ शकतात जेव्हा या रुग्णालयांना नवीन लसींचा साठा मिळेल. सध्याचा साठा आधीच नोंदणीकृत असलेल्यांसाठी वापरला जाईल.”

जी नॉर्थ (G North)वॉर्डमधील नागरिक मंचाचे सदस्य भाग्यश्री केळकर म्हणाले की, खाजगी सोसायटीमधील नागरिकांना केंद्राच्या कोविन या अर्जावर स्लॉट शोधण्यात अडचणी येत आहेत.

तथापि, छोट्या इमारतींमध्ये शिबिरं घेणं व्यावहारिक किंवा किफायतशीर ठरणार नाही कारण रहिवाशांची संख्या कमी असेल. कॉलेज किंवा शाळा बंद असल्यामुळे हे एकतर महाविद्यालय किंवा शाळेत आयोजित केलं जाऊ शकतं. छोट्या इमारतींमध्येही अनेक ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या लसीचे डोस आधीच घेतले असतील.

काही दिवसांपूर्वी मुलुंड आणि गोरेगावमध्ये देखील सोसायटी आवारातच लसीकरण मोहीम राबवण्यात आली होती. मुलुंडमद्ये ३००-४०० रहिवाशांना लस दिली गेली. तर गोरेगावमध्ये डोर टू डोर लसीकरण मोहीम राबवण्यात आली.

दरम्यान, लसींच्या तुटवड्यामुळे मुंबई महानगरपालिकेनं ग्लोबल टेंडर काढत लस आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून मुंबईकरांना लवकरात लवकर कोविड प्रतिबंधक लस देण्यात येईल. महानगरपालिकेतर्फे जास्तीत जास्त लसीकरण केंद्र उभारण्यात आली आहे. जर पालिकेनं काढलेल्या या ग्लोबल टेंडरला चांगला प्रतिसाद मिळाला तर काही महिन्यातच मुंबईतील नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल, अशी रचना पालिकेतर्फे करण्यात आली आहे.



हेही वाचा

परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या २ डोसमधील कालावधी कमी करा, मनपाचं केंद्राला पत्र

रिलायन्स करणार कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांचं मोफत लसीकरण

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा