Advertisement

परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या २ डोसमधील कालावधी कमी करा, मनपाचं केंद्राला पत्र

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई महापालिकेनं विशेष लसीकरण सुरु केलं आहे.

परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या २ डोसमधील कालावधी कमी करा, मनपाचं केंद्राला पत्र
SHARES

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कोव्हिशील्ड लसींच्या दोन डोसमधील (Corona vaccine dose) कालावधी कमी करावा, अशी मागणी मुंबई महापालिकेनं (Mumbai Municipal Corporation) केंद्र सरकारला पत्र लिहून केली आहे.

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई महापालिकेनं विशेष लसीकरण सुरू केलं आहे. मात्र दोन लसींमधील अंतरामुळे विद्यार्थ्यांची अडचण होत आहे. त्यासाठी आता मुंबई महापालिकेनं केंद्राला विनंती केली आहे.

सध्या कोविशिल्डच्या दोन लसींमधील कालावधी ८४ दिवसांचा असल्यानं, विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळं विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी, दोन लसींमधील कालावधी ८४ दिवसांवरून ४२ ते ६० दिवसांवर करण्याची मागणी करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी याबाबतची माहिती दिली.

परदेशात ऑगस्टच्या सुरुवातीला कॉलेज सुरू होत असल्यानं त्यापूर्वी दोन्ही लस दिल्याचं सर्टिफिकेट मुलांना मिळणं आवश्यक आहे. सध्या मुंबईत सोमवार, मंगळवार आणि बुधवार या तीन दिवशी कस्तुरबा, कूपर आणि राजावडी इथं परदेशात जाणाऱ्यांना विद्यार्थ्यांना लस देणं सुरू आहे.

शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वॉक इन सुविधेद्वारे लस देण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीच याबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेकडून लसीकरणाबाबतच्या सुधारित नियमावलीनुसार, ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात जायचे आहे त्यांना वॉक इन (Walk In) सुविधेद्वारे लस दिली जाणार आहे. यात १८ ते ४४ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश असेल.



हेही वाचा

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबईत १ जूनला विशेष लसीकरण सत्र

शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्यांचे होणार Walk In Vaccination, 'या' रुग्णालयांमध्ये लसीकरणाची सुविधा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा