Advertisement

मालाडमधील इन्फिनिटी मॉलमध्ये विनामूल्य ड्राइव्ह-इन लसीकरणाचे आयोजन

नगरसेविका जया सतनाम सिंह टिवाना यांनी मोफत लसीकरण मोहिमेचं उद्घाटन केलं.

मालाडमधील इन्फिनिटी मॉलमध्ये विनामूल्य ड्राइव्ह-इन लसीकरणाचे आयोजन
SHARES

मुंबई शहरात ड्राईव्ह ईन लसीकरण मोहीमेला चांगली पसंती मिळत आहे. अनेक ठिकाणी ड्राईव्ह ईन मोहिमेला सुरुवात झाली आहे. मालाडमध्ये देखील इन्फिनिटी मॉलमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)च्या सहकार्यानं शुक्रवार २८ मे पासून पार्किंगमध्ये नागरिकांसाठी लसीकरण सुविधा सुरू केली आहे.

नगरसेविका जया सतनाम सिंह टिवाना यांनी मोफत लसीकरण मोहिमेचं उद्घाटन केलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे सर्व नागरिक लस विनामूल्य मिळवण्यासाठी कोव्हीन अ‍ॅपवर नोंदणी करून घेऊ शकतात. ड्राइव्ह-इन सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत मालाडच्या इन्फिनिटी मॉल इथं आयोजित करण्यात आलं आहे.

याव्यतिरिक्त, साइटवर उपलब्ध लस डोस कोविशिल्ट असेल. नागरिकांना डोस १ किंवा डोस २ चा लाभ घेता येतो आणि फक्त त्यांचीच आधार कार्ड घेऊन जाणं आवश्यक आहे. वाहनांच्या बाहेर न जाता सहज लसीकरण करणं आवश्यक आहे.

याव्यतिरिक्त, लोकांना लसीचं महत्त्व पटवून देण्यासाठी इन्फिनिटी मॉलनं, टी.ई.ए.एम या विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्यानं मोहीम राबवली आहे. यावर्षी, टी.ए.ए.एम.नं १० पेक्षा जास्त मूळ भाषांमध्ये स्थानिक समुदायांसाठी लसीकरण शिक्षण आणि वितरण मोहीमेचा डेटा जाहीर केला आहे.

विद्यार्थ्यांनी तयार केलेला डेटा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाला आहे. यासोबतच लसीबाबत असणारा सामान्य समज आणि गैरसमज दूर करण्यासाठी देखील हा डेटा उपयुक्त आहे. त्यांनी लस घेण्याचं महत्त्व सांगितलं आहे आणि कोरोनाव्हायरस विरूद्ध ही लढाई जिंकण्यासाठी हा प्रयत्न आहे.

याबद्दल बोलताना, इन्फिनिटी मॉलचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकेश कुमार म्हणाले, “पालिकेसमवेत एकत्रितपणे ही मोहीम लसीकरण आयोजित केल्याबद्दल आम्हाला आनंद झाला. या आव्हानात्मक काळात, लोकांना शक्य तितक्या लवकर लसीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे. या व्यतिरिक्त, लोकांना लसीकरण करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही टी.ई.ए.एम. सह मोहिमेसाठी सहयोग केले, ज्याचे ड्राइव्ह-इनमध्ये अनावरण झाले.”



हेही वाचा

रुग्णाला डिस्चार्ज देण्याआधी बिल पाठवा, नवी मुंबई पालिकेचा रुग्णालयांना आदेश

म्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेत नवी मुंबईतील ४ रुग्णालये

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा