Advertisement

खासगी कार्यालये, गृहनिर्माण संस्थांमध्येही होणार लसीकरण; बीएमसीने जाहीर केली नियमावली

याबाबतच्या मार्गदर्शक सूचनाही पालिकेने जारी केल्या आहेत. लसीकरणाचा हा प्रयोग यशस्वी झाला तर डोर-टू-डोर लसीकरण अभियान सुरू करण्याचा पालिका विचार करणार आहे.

खासगी कार्यालये, गृहनिर्माण संस्थांमध्येही होणार लसीकरण; बीएमसीने जाहीर केली नियमावली
SHARES

खासगी कामाच्या ठिकाणी आणि गृहनिर्माण संस्थांमध्ये कोरोना लसीकरण करण्यास आता मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचनाही पालिकेने जारी केल्या आहेत. लसीकरणाचा हा प्रयोग यशस्वी झाला तर डोर-टू-डोर लसीकरण अभियान सुरू करण्याचा पालिका विचार करणार आहे.

सध्या मुंबईतील खासगी रुग्णालय, सरकारी रुग्णालय, आणि पालिकेने सुरु केलेल्या लसीकरण केंद्रांमध्येच नागरिकांना कोरोनाची लस दिली जात आहे. मात्र आता मुंबईतील खासगी सोसायट्या आणि खाजगी कंपन्यांमध्येही लसीकरण केलं जाणार आहे.  पालिकेने लसीचा साठा विचारात घेऊन खासगी रुग्णालयांना सोसायट्यांचा आवारात लसीकरण मोहीम सुरु करण्याची परवानगी दिली आहे.

लसीकरणासाठीच्या मार्गदर्शक सूचना 

गृहनिर्माण संस्था आणि खासगी कंपनी आता मुंबईतील खाजगी लसीकरण केंद्राशी करार करू शकतील. गृहनिर्माण संस्था आणि कंपन्यांना स्वत: लस खरेदी कराव्या लागतील. कामाच्या ठिकाणी लसीकरण शिबीर भरवता येतील. मुंबईतील खाजगी लसीकरण केंद्रे आणि गृहनिर्माण संस्था / कंपनी या दोघांना संयुक्तपणे डोसची किंमत ठरवावी लागेल. 

 खाजगी कंपन्या / गृहनिर्माण संस्था आणि खाजगी रुग्णालयात समन्वय साधणाऱ्या एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल. हे नोडल अधिकारी कार्यालयांमधील किंवा गृहनिर्माण संस्थांमधील लसीकरणाच्या सर्व बाबींवर देखरेख व सुलभता राखण्यासाठी लाभार्थ्यांची नोंदणी, साठा, यावेळी लागणाऱ्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न करेल.

लसीकरणापूर्वी लाभार्थ्यांना Co-WIN portal वर नोंदणी करणे बंधनकारक असेल. हे नोडल अधिकारी सर्व नागरिकांची ऑनलाईन नोंदणी सुनिश्चित करतील. खाजगी कार्य़ालयांबाबत थेट लसीकरण केंद्रांवरही  नोंदणी करता येईल मात्र, केवळ कामाच्या ठिकाणी असलेल्या कर्मचार्‍यांना अशी थेट नोंदणी उपलब्ध असेल. या व्यतिरीक्त  खाजगी कार्य़ालयातील कर्मचार्‍यांच्या कुटूंबातील सदस्यांना लसीकरण करायचे असल्यास Co-WIN portal वर नोंदणी असणे आवश्यक आहे.

एका खासगी लसीकरण केंद्रामार्फत शहरातील इतर कार्यालये किंवा गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही लसीकरण कार्यक्रम घेतला जाऊ शकतो. अशा प्रकारच्या खासगी लसीकरण केंद्रांना जोडलेली कार्यालये आणि गृहनिर्माण संस्थेची माहिती स्थानिक आरोग्य प्राधिकरण (संबंधित प्रभाग एमओएच) आणि ईपीआय यांना दिली जाईल. या शिबिरांतील लस घेणाऱ्या लाभार्थ्यांची जबाबदारी गृहनिर्माण संस्था आणि कंपनीची असेल. ज्या ठिकाणी लसीकरणाची प्रक्रिया पार पाडली जाईल त्या ठिकाणी लसीकरणासाठीच्या अत्यावश्यक सुविधा असणं गरजेचं आहे.



हेही वाचा

कोविन पोर्टलमध्ये करण्यात आले हे नवीन बदल, जाणून घ्या प्रक्रिया

ठाण्यात आढळला म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा