Advertisement

भायखळ्यातील 'या' प्रसिद्ध कंपनीच्या इमारतीत पालिकेचं क्वारंटाईन सेंटर

मुंबईतल्या एका कंपनीनं आपलं ऑफिस क्वारंटाईन केंद्र म्हणून पालिकेच्या स्वाधिन केलं आहे.

भायखळ्यातील 'या' प्रसिद्ध कंपनीच्या इमारतीत पालिकेचं क्वारंटाईन सेंटर
SHARES

कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईतच आहेत. त्यामुळे मुंबईत क्वारंटाईन केंद्र उभारण्यावर अधिक भर दिला जात आहे. आतापर्यंत पालिकेनं कॉलेजेस, शाळा, जिमखाने, रिकाम्या इमारती अशा काही जागा क्वारंटाईन केंद्रासाठी ताब्यात घेतल्या आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पालिका अजूनही काही ठिकाणं क्वारंटाईन केंद्र म्हणून उभारण्यावर भर देत आहेत.

येत्या काही काळात क्वारंटाईन केंद्राची गरज अधिक भासू शकते. हाच विचार करून मुंबईतल्या एका कंपनीनं आपलं ऑफिस क्वारंटाईन केंद्र म्हणून पालिकेच्या स्वाधिन केलं आहे. भायखळा इथल्या रिचर्डसन अॅण्ड क्रुड्स या इंजिनीअरिंग कंपनीनं आपले ऑफिस क्वारंटाईन सेंटरसाठी दिलं होतं. त्यानुसार या कंपनीत मुंबई महानगरपालिकेनं १००० बेड्स सह क्वारंटाईन सेंटर उभारलं आहे.

भायखळ्यातील या इमारतीत १००० बेड्समध्ये ३०० आयसीयू बेड्स आहेत. ज्यात ऑक्सिजन पुरवठा आणि अन्य सुविधा देण्यात आल्या आहेत. रिचर्डसन अॅण्ड क्रुड्स कंपनीत तयार करण्यात आलेलं क्वारंटाईन सेंटर जूनच्या अखेरीस सुरू करण्यात येईल. कोरोना बाधित रुग्णांसाठी तयार करण्यात आलेले हे सेंटर खूपच फायदेशीर ठरेल, असं मुंबई महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा