Advertisement

पालिका होम टेस्ट किट खरेदी करणाऱ्यांची माहिती गोळा करतेय

पालिका केमिस्टच्या मदतीनं COVID-19 होम टेस्ट किट्स खरेदी करणाऱ्यांचा डेटा गोळा करेल.

पालिका होम टेस्ट किट खरेदी करणाऱ्यांची माहिती गोळा करतेय
(Representational Image)
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिके(BMC) नं सांगितलं की, ते अन्न आणि औषध प्रशासनाला (FDA) पत्र लिहून मुंबईतील सर्व केमिस्टना कोविड-19 चाचण्या खरेदी करणाऱ्यांचा डेटा संकलित करून शेअर करण्यास सांगतील.

अहवालानुसार, औषधविक्रेत्यांकडून किट खरेदी करणाऱ्यांची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे निकाल समजून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधेल. कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. बरेच जण होम टेस्टिंग किट वापरल्यानंतर त्यांच्या चाचणीचे परिणाम उघड करत नाहीत.

पालिका अधिकार्‍यांनी दावा केला आहे की, महिन्याच्या पहिल्या १० दिवसांत शहराला कोरोनाव्हायरससाठी जवळपास ३००,००० ते ३५०,००० होम टेस्ट किट्सचा पुरवठा करण्यात आला होता. परंतु, घरगुती चाचण्या घेतलेल्या सुमारे ९८,००० जणांचे परिणाम नागरी प्राधिकरणाला सांगण्यात आले आहेत.

सुरेश काकाणी, अतिरिक्त महापालिका आयुक्त यांनी कोविड-19 साठी घरपोच चाचणी घेणार्‍यांची माहिती अधिकार्‍यांना कळवली जाणारी यंत्रणा कशी तयार केली याबद्दल माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, गुरुवारी, १३ जानेवारी रोजी, ते FDA ला पत्र लिहून मुंबईतील केमिस्ट मालकानं होम टेस्टिंग किट खरेदी करणाऱ्यांचे तपशील दिले आहेत की नाही हे पाहण्यास सांगतील.

हा डेटा प्राप्त केल्यानंतर, BMC च्या २४ वॉर्ड वॉर रूम ज्यांचे निकाल माहित नाहीत त्यांच्याशी संपर्क साधतील, असं काकाणी म्हणाले. किट विकत घेतल्यानंतर लोकांना निर्मात्याच्या मोबाईल अॅपचा वापर करून त्यांचे परिणाम कळवण्यास सांगितलं जातं हे पालिका अधिकार्‍यांनी स्पष्ट केलं आहे.

निर्माता त्या बदल्यात अधिकार्‍यांना कळवतो, अशा प्रकारे, जे अॅप अद्यतनित करत नाहीत त्यांच्याशी संपर्क साधला जाईल. कथनांच्या आधारे, असा अंदाज आहे की आठवड्याच्या अखेरीस, BMC एक सर्वसमावेशक परिपत्रक जारी करेल ज्यामध्ये होम टेस्ट किट विक्रीचा समावेश असेल.हेही वाचा

आता लक्षणं असणाऱ्यांचीच होणार चाचणी

मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा