मागील काही दिवस कोरोना रुग्णांत घट होत होती. परंतू बुधवारी पुन्हा एकदा रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे ४६ हजार ७२३ नवे रुग्ण आढळले. दिवसभरात मुंबईत १६ हजार ४२० नवे रुग्ण आढळले.
बुधवारी ४६,७२३ नवे रुग्ण आढळल्यानं चिंता वाढली. राज्यातील कोरोना संसर्ग अद्याप कमी झालेला नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. मुंबईत बुधवारी आढळलेल्या १६ हजार ४२० रुग्णांपैकी ९१६ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील ९८ रुग्णांना ऑक्सीजनची गरज भासली.
#CoronavirusUpdates
12th January, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/r13JeATQrC
राज्यात गेल्या २४ तासांत ३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या २ लाख ४० हजार झाली. ओमायक्रॉनच्या नव्या ८६ पैकी ५३ रुग्ण हे पुणे शहरातील आहेत. राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनचे १३६७ रुग्ण आढळले आहेत.
शहरांबरोबरच ग्रामीण भागांतही कोरोना रुग्णवाढ नोंदविण्यात येत आह़े दिवसभरात नाशिक जिल्हा १४५७, पुणे शहर ४९०३, उर्वरित पुणे जिल्हा १४११, पिंपरी-चिंचवड १९४७, सातारा ७०९, रत्नागिरी २६१, सिंधुदुर्ग १४६, औरंगाबाद शहर २६१, नागपूर शहर १२०७ नवे रुग्ण आढळले.