Advertisement

रेमडेसिवीरच्या दरापेक्षा रुग्णांचा जीव वाचवण्यास प्राधान्य - आयुक्त चहल

मुंबई महापालिका आयुक्तांनी मुंबईसाठी तब्बल दोन लाख रेमडेसिवीर इंजेक्शन मिळविली आहेत. मात्र, या इंजेक्शनसाठी जास्त पैसे मोजावे लागल्याने टीका केली जात आहे.

रेमडेसिवीरच्या दरापेक्षा रुग्णांचा जीव वाचवण्यास प्राधान्य - आयुक्त चहल
SHARES

मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे बेड, रेमडेसिवीर इंजेक्शन, आॅक्सिजनची कमतरता भासत आहे. रेमडेसिवीरचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर  भासत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर धावाधाव करावी लागत आहे. 

या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्तांनी मुंबईसाठी तब्बल दोन लाख रेमडेसिवीर इंजेक्शन मिळविली आहेत. मात्र, या इंजेक्शनसाठी जास्त पैसे मोजावे लागल्याने टीका केली जात आहे. आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी रुग्णांचा जीव वाचवणे याला प्राधान्य असल्याचं म्हटलं आहे. जास्त दराने ही खरेदी झाल्याचा वाद निरर्थक असून या क्षणी रुग्णांचा जीव वाचवणे यालाच माझे सर्वोच्च प्राधान्य आहे, असं चहल यांनी म्हटलं आहे.

मुंबईत वाढती रुग्णसंख्या पुाहता आयुक्तांनी  रेमडेसिवीर स्वतंत्रपणे तात्काळ निविदा मागविण्याचा निर्णय घेतला. चहल यांनी थेट रेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांशी संवाद साधून निविदा भरण्याबाबत विचारणा केली. त्यानंतर महापालिकेने काढलेल्या निविदेत मायलन या एकाच कंपनीने निविदा भरली. एकच पुरवठादार असल्याने काही दिवस थांबून मायलन कंपनीला पुरवठ्याचे काम देण्याचा निर्णय घेण्यात आला. मायलन कंपनीने रेमडेसिवीरच्या प्रति कुपीसाठी १५६८ रुपये दर दिला आहे. दोन लाख कुप्यांचा पुरवठा ही कंपनी करणार आहे. यापैकी २० हजार कुप्यांचा पुरवठा कंपनीने केला आहे.

हाफकिनला प्रति कुपीसाठी ६६५ रुपये मोजावे लागले आहेत.  हाफकिनने दिलेल्या दरापेक्षा दुप्पट किमतीला मुंबई महापालिका रेमडेसिवीर कशी खरेदी करते असा प्रश्न यातून उपस्थित होत आहे. याबाबत पालिका आयुक्त चहल यांना विचारले असता, रुग्णांचा जीव वाचवणे याला आयुक्त म्हणून माझे सर्वोच्च प्राधान्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. चहल म्हणाले की, 

मुंबई महापालिकेने ज्या दराने रेमडेसिवीर घेतले त्याच दराने काही राज्ये  रेमडेसिवीर घेत आहेत. आरोग्य विभागाअंतर्गत काही जिल्हा रुग्णालयांनी महापालिकेच्या दराने रेमडेसिवीर खरेदीचा निर्णय घेतला आहे. हाफकिनने काढलेल्या निविदेत ६६५ रुपये  दर आला असला तरी आजपर्यंत निविदा मिळालेल्या कंपनीने रेमडेसिवीरचा पुरवठा केलेला नाही. हाफकिनने निविदा काढल्यानंतर महापालिकेने निविदा काढली असून दोन लाख रेमडेसिवीरचा पुरवठा महापालिकेला होणार असून त्यातील २० हजार रेमडेसिवर आम्हाला मिळाले आहेत.



हेही वाचा

जसलोक आता कोविड रुग्णालय; महापालिकेचा निर्णय

उपनगरीय रेल्वतून सर्वसामान्यही करू शकतात प्रवास

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा