Advertisement

जसलोक आता कोविड रुग्णालय; महापालिकेचा निर्णय

महापालिकेनं दक्षिण मुंबईतील पेडर रोड येथील जसलोक रुग्णालय संपूर्णत: कोरोना रुग्णालयात रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

जसलोक आता कोविड रुग्णालय; महापालिकेचा निर्णय
SHARES

मुंबईतील कोरोना (coronavirus) रुग्णांची संख्या वाढत असून खासगी रुग्णालयातील खाटांची मागणीही वाढली आहे. त्यामुळे महापालिकेनं दक्षिण मुंबईतील पेडर रोड येथील जसलोक रुग्णालय संपूर्णत: कोरोना रुग्णालयात रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या रुग्णालयात आता कोरोनाव्यतिरिक्त अन्य रुग्णांना दाखल केले जाणार नाही. तसंच, सध्या असलेल्या कोरोना व्यतिरिक्त अन्य रुग्णांनाही इतर रुग्णालयांत हलविण्यात येणार आहे.

शनिवार सकाळपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात जसलोक रुग्णालयानं कोरोना रुग्णांची देखभाल अतिशय चांगल्या पद्धतीनं केली होती. त्यामुळं आता दुसऱ्या लाटेच्या वेळी महापालिकेनं (bmc) या रुग्णालयाला संपूर्ण कोरोना रुग्णालयाचा दर्जा देण्याचं ठरवलं आहे. त्यादृष्टीनं महापालिकेनं जसलोक रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला निर्देश दिले आहेत. या प्रक्रियेमुळं कोरोना रुग्णांसाठी २५० खाटा वाढणार आहेत. त्यात अतिदक्षता विभागाच्या ४० खाटांचा समावेश आहे.

सेव्हन हिल्स रुग्णालयातही अतिदक्षता विभागाच्या ३० खाटा वाढविण्यात आल्या आहेत, तर गोरेगावच्या नेस्को येथील कोरोना भव्य केंद्रातही येत्या ७ दिवसांत १५०० खाटा वाढवण्यात येणार आहेत. या सर्व खाटांना प्राणवायूची सुविधा असेल, असेही महापालिका प्रशासनानं म्हटले आहे.

व्यवस्थापनाला निर्देश

पुढील २ दिवसांत रुग्णालयातील कोरोना व्यतिरिक्तच्या प्रकृती स्थिर असलेल्या रुग्णांना घरी पाठवण्यात यावे.

वैद्यकीय उपचाराची निकड असलेल्या कोरोनाव्यतिरिक्त अन्य रुग्णांना पुढील ४८ तासांत जवळच्या अन्य रुग्णालयात हलवावे.

रुग्णांच्या नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्यात.

कोरोना संशयित रुग्णांसाठी वेगळा विभाग तयार करावा.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा